Gas-Delivery-Boy 
पुणे

Lockdown : गॅस एजन्सीच्या डिलव्हरी बॉयकडून होतेय ग्राहकांची लूट!

सकाळ वृत्तसेवा

गोखलेनगर : कोरोनामुळे सामान्य नागरिक त्रासून गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाची खुलेआम फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सेनापती बापट रस्ता भागातील विश्वनाथ गॅस एजन्सीकडून ग्राहकांची गॅस सिलेंडरसाठी लूट करण्यात येत आहे, अशी तक्रार वडारवाडी येथील स्वीकृत सदस्या अपर्णा कुऱ्हाडे यांनी चतु:र्श्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.

घरगुती गॅस सिलेंडर घरी पोहोच करण्यासाठी ७३४ रुपये आकारले जात आहेत. मात्र, विश्वनाथ गॅस एजन्सीच्या डिलव्हरी बॉयने ग्राहकांकडून ८०० ते ८५० रूपये घेतल्याने वडारवाडी येथील कामगार वर्गाची लूट होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रत्येक सिंलेडरमागे ८० ते १०० रुपये जादा दर आकारत पैसे उकळले जात आहेत. डिलिव्हरी बॉय ड्रेस कोडमध्ये न येता इतर कपडे घालून गॅस पोहोच करायला येतात. तसेच गॅस सिलेंडरमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम असताना देखील ग्राहकांना सिलेंडर दिला जात आहे.

मागील महिन्यात सिंलेडरचा स्फोट झाल्यामुळे वडारवाडी येथील घरे जळून खाक झाली होती. या घटनेची दाहकता अजून संपलेली नाही. तरीदेखील या भागातील ग्राहकांना लिकेज सिलेंडर दिले जात आहेत. कोणत्याही वस्तूची जादा दराने विक्री करू नये, अशा सूचना प्रशासनाने विक्रेत्यांना दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला दुजोरा देत संबंधित गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉय जादा पैसे घेऊन सामान्य नागरिकांची लूट करत आहेत.

''कमी कामगार संख्या असतानाही आम्ही काम करतोय. एखाद्या डिलिव्हरी बॉयने जादा पैसे घेतले असतील, तर त्या मुलाला कामावरून काढले जाईल. मात्र, लिकेज सिलेंडर लगेच बदलून दिले जात आहेत. ज्या मुलाने जादा पैसे घेतले होते, त्याने ते लगेच परत केले आहेत.''

- सुधीर फुले, मॅनेजर, विश्वनाथ गॅस एजन्सी

''ग्राहकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी १८००२२४३४४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. आमच्याकडे तक्रारी आल्यास आम्ही त्याची सखोल चौकशी करू आणि संबंधितांवर कारवाई देखील करू.''

- सौरभ मुखर्जी, प्रादेशिक अधिकारी, भारत पेट्रोलियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT