Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: 'पुणे मेट्रो'चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांना तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांना तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे. पंकज गुल जगासिया (वय 43) यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. फसवणुकी प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (वय 70) व सनत ईश्वर परमार (वय 46) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी कामगार पुतळा परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता. मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणुक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे कारण पंकज जगासिया यांना सांगितले. गुंतवणुक केल्यास जादा रक्कम मिळेल असे अमिष दाखवले आणि फसवणूक केली आहे.

आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडुन 1 कोटी 21 लाख रुपये घेतले. मात्र 2016 पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. यासंबधी पोलिस अधिक तपास करत आहेत. पुण्यातून वारंवार अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT