saswad 
पुणे

कोरोनाला हरविण्यासाठी हवेत रोकडे आजींसारखे हजारो हात 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील  67 वर्षीय  शिवणक्लास प्रशिक्षिक महिलेने कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या कामात आपल्यापरीने हातभार लावायला सुरवात केली आहे. लाॅकडाउननमुळे क्लास बंद असल्याने त्यांनी स्वतः शिवून हजारो गरजूंना मास्क मोफत वितरीत केले. आजही त्यांचे हे कार्य सुरू आहे.

सासवड शहरातील बोरावके गल्लीतीलस या शिवणक्लास शिक्षिकेचे नाव आहे, पद्मिनी छगन रोकडे. त्यांनी सासवड शहरातील शेकडो गोरगरीब लोकांना, भाजी विक्रेत्यांना व स्वच्छता कर्मचारी यांना मास्कचे मोफत वाटप केले. त्यासाठी त्यांनी स्वतः शिलाई मशिनवर मास्क शिवले आहेत.

सासवड नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी यांनाही मोफत मास्कचे वाटप केले. त्यानिमित्त नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण पाणी पुरवठा अधिकारी रामानंद कळसकर, सुतार यांनी त्यांना धन्यवाद दिले. पद्मिनी रोकडे यांना या उपक्रमासाठी कुटूंबातील दोन्ही मुले राजू व संजय यांनीही मदत केली.  
 पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


पद्मिनी रोकडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्या विविध गावांच्या हजारो विद्यार्थिनींना आव्हान  केले आहे की, आपआपल्या गावातील गोरगरीब लोकांना मोफत मास्कचे वाटप करून आपले गाव आत्मनिर्भर करा. कोरोना संसर्ग रोखण्यास प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT