indapur tahsildar 
पुणे

कोरोना रुग्णांच्या पार्थिवास महिला तहसीलदारांकडून मुखाग्नी...

डाॅ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 84 वर्षाचे जेष्ठ नागरिक व माळवाडी नंबर 2 राऊतवस्ती येथील 65 वर्षाच्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवास तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मुखाग्नी दिला. इंदापूर नगरपरिषद, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक गफूरभाई सय्यद, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने अंत्यविधी पार पाडण्यासाठी मदत केली.  

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात ३० जुलै रोजी सकाळी भिगवण, तर दुपारी माळवाडी राऊतवस्ती येथील कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना भिगवणच्या रुग्णाचा काल रात्री, तर माळवाडी येथील रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी ही माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली. मात्र, त्यांनी मृतदेह आपल्या गावी नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तहसीलदार मेटकरी यांनी इंदापूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. 

त्यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संघटक तथा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे संस्थापक सचिव गफूरभाई सय्यद यांच्याशी संपर्क साधला. इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून पार्थिव वैकुंठ स्मशान भूमीत आणले. काल रात्री भिगवणच्या, तर आज सकाळी माळवाडी येथील कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, प्रा. कृष्णा ताटे, अमोल खराडे, आकाश गावडे, सुरज मिसाळ, अजय रजपूत, अजिंक्य ताटे यांनी विधी पार पाडण्यास मदत केली. या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला मूर्ख नाहीत, भाजपला पहिला धक्का बसलाय; प्रियांका गांधींचा हल्लाबोल, म्हणाल्या, केंद्र सरकारसाठी 'काळा दिवस'

सुंदर मराठी नायिकेचं अपघातात बिघडलं सौंदर्य, नवऱ्याने सख्ख्या बहिणीशी लग्न करत दिला धोका ! मृत्यूवेळीही पडल्या एकट्या

Latest Marathi News Live Update: भोंदू अशोक खरातला चौथ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; SITचा पुढील कारवाईचा प्रयत्न

Battery Blast Safety Tips : विमानतळावर स्कॅनिंग दरम्यान फुटला मोबाईल; काय तुमच्या फोनमध्येही आहे 'या' प्रकारची बॅटरी? आत्ताच करा चेक

Solapur Crop Insurance : कंपनीने घेतले 151 कोटी, शेतकऱ्यांना दिले फक्त 25 कोटी; सोयाबीन, कांदा, तूर उत्पादकांना पीकविम्याची प्रतीक्षाच!

SCROLL FOR NEXT