gaja marane 
पुणे

फरार गजा मारणे कोर्टात आला, जामीन घेऊन गेला; पोलिसांना माहितीच नाही

सकाळ डिजिटल टीम

वडगाव मावळ - पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेला सराईत गुन्हेगार गजा मारणे याच्यावर तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी कोणताही गाजावाजा न करता अचानक वडगाव मावळ न्यायालयात तो स्वतःहून हजर झाला. वडगाव न्यायालयाने त्याला 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, मारणे न्यायालयात हजर होणार असल्याची पोलिसांनाही कुणकूण न लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे या मार्गावरुन बेकायदा रॅली काढल्याच्या आरोपाखाली मारणे याच्यासह त्याच्या अनेक समर्थकांवर पुणे, पिंपरी-चिंचवड व शिरगाव पोलिस चौकीत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. रॅलीप्रकरणी शिरगाव (तळेगाव) पोलिसांनी त्याच्यावर पहिला गुन्हा नोंदवला होता. याबाबत मारणे गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास वडगाव मावळ न्यायालयात स्वतःहून हजर झाला. 

सरकारच्या बाजूने ॲड. वाळके यांनी तर मारणे याच्या बाजूने ॲड. विपुल तुशिंग, ॲड. सौरभ दाभाडे, ॲड. अक्षय बडवे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गुणारी यांनी मारणे याला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. मारणे सुमारे तासभर न्यायालयात होता. जामीन मंजूर झाल्यानंतर लागलीच तो निघून गेला. 

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्या प्रकरणी गजा मारणेसह समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांविरोधात पोलिसांनी आता आक्रमक कारवाई करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली. तसचं मिरवणुकीत सहभागी असलेल्या चार आलिशान गाड्यासुद्धा जप्त केल्या आहेत. 

कारागृहातून सुटल्यावर गजा मारणेच्या समर्थकांनी त्याची 15 फेब्रुवारीला मिरवणूक काढली होती. तेव्हा जवळपास 300 गाड्यांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता. याप्रकरणी तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वारजे आणि कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो, व्हिडिओवरून पोलिस तपास करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT