ganesh chaturthi 2023 local ganpati mandal get 5 years permission new mandal have to take permission ajit pawar esakal
पुणे

Ganesh Chaturthi 2023 : गणेश मंडळांना उत्सवासाठी पाच वर्षांसाठी परवानगी

मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवणार; ध्वनिक्षेपकास पाच दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेश मंडळांना उत्सवासाठी पाच वर्षांसाठी परवानगी राहील. त्यामुळे मंडळांना दरवर्षी परवानगी घेण्याची गरज नाही. परंतु नवीन गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवात मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, ध्वनिक्षेपकास २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सव नियोजनासाठी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांची बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री पवार,

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. या वेळी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी सूचना करीत सकारात्मक चर्चा केली.

पवार म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी, प्रशासन नियोजन करीत आहे.

मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. मंडळांनी वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही. मात्र मूर्ती विसर्जन करताना उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल, याकडे लक्ष द्यावे. धनकवडी भागातील मंडळांचा एकत्रित विसर्जन मिरवणुकीचा उपक्रम अनुकरणीय आहे. मानाच्या गणपतींसोबत इतर मंडळांशीही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात.

पालकमंत्री पाटील म्हणाले, महापालिकेने गणेश मंडळांकडून कमानींसाठी कर आकारू नये. प्रशासनाने गणेश मंडळांच्या समस्या दूर कराव्यात. नियंत्रण मनोरे स्थापित करून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलिसमित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घ्यावी. गणेश मंडळांनी स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडावा.

पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. गतवर्षी तीन हजार ५६६ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यावर्षीही तेवढ्याच गणेश मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.

गणेशोत्सवाची तयारी

  • परिमंडळनिहाय व्हाट्सॲप ग्रुप तयार करणार

  • वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नियोजन

  • वाहनतळांसाठी मैदानांवर अतिरिक्त व्यवस्था

  • कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात

  • दोन्ही महापालिका रस्त्यांवरील उघडे चेंबर्स बंद करणार

  • मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवणार

  • कोंडी टाळण्यासाठी काही भागात शक्य असल्यास वाहतूक दुतर्फा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT