Ganesh Visarjan Pune 
पुणे

Ganesh Visarjan Pune: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा आधी मेट्रोने प्रवास नंतर दुचाकीवर स्वार...

Sandip Kapde

Ganesh Visarjan Pune: पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपती मंडपात पोहचण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आधी मेट्रोने प्रवास केला नंतर दुचाकीने ते विसर्जन मिरवणुकीत पोहचले.

आज सकाळपासून आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोचा पर्याय निवडला. काल पाटील यांनी गर्दी टाळण्यासाठी पुणेकरांना मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले होते. (pune latest news)

चंद्रकांत पाटील यांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज वनाझ ते पुणे महापालिका असा मेट्रोने प्रवास केला. त्यानंतर पुणे मेट्रो ते बाबूगेनू चौक येथे दुचाकीने प्रवास केला. यावेळी त्यांनी बाबूगेनू चौकात बाप्पाच्या स्वागतासाठी काढलेल्या रांगोळीचे उद्घाटनही केले.

चंद्रकात पाटील यांचे आवाहन -

श्री गजाननाला निरोप द्यायला पुणे आणि परिसरातील लक्षावधी भाविकांची गर्दी होत असते. तसेच पावसामुळे वाहतूक कोंडीची शक्यता देखील असते. प्रशासनाने याबाबतची खबरदारी घेतली आहेच, पण संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी माझी सर्व पुणेकरांना नम्रतापूर्वक विनंती आहे की, मी स्वतः मेट्रोने प्रवास करणार आहे. आपणही  मेट्रोने प्रवास करुया आणि गैरसोय टाळुया, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT