pmp.jpg 
पुणे

हडपसरमध्ये पीएमपी आगारासमोरच रिक्षांचा गराडा; अपघाताची शक्‍यता 

संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : हडपसर पीएमपी डेपोतून बेकायदेशीररीत्या खासगी वाहने ये-जा करतात, तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षा आगाराच्या प्रवेशद्वारासमोरच थांबलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. वाहतूक पोलिस व पीएमपी विभागाने तातडीने वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

दरम्यान, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणा-यांना जाब विचारल्यास पीएमपीच्या अधिका-यांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे, कित्येकवेळा दमही भरला जातो. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयासही पत्र दिले आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. 

प्रवासी कविता भावे म्हणाल्या, ""हडपसर पीएमपी आगारातून खासगी वाहने धावतात. त्यामुळे रोजच प्रवाशांचे किरकोळ अपघात होत आहेत. आगार परिसरात 200 मीटरपर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंदी असते, मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच आगारात ये-जा करावी लागते, तसेच खासगी रिक्षा थेट आगाराच्या प्रवेशद्वारा समोरूनच प्रवाशांची चढउतार करतात. त्यामुळे पीएमपीला तोटा सहन करावा लागत आहे.'' 


""आगारातून जाणा-या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाला पत्र दिले आहे, तसेच आमचे कर्मचारी देखील येथे तैनात करणार आहोत. खासगी वाहनचालकांनी आगारातून वाहने नेऊ नयेत, यासाठी सहकार्य करावे.

- सोमनाथ वाघोले, आगारप्रमुख, हडपसर विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT