पुणे

धोक्याची घंटा ! आंबेगाव प्रकल्पातील कचरा ओढ्यात

अशोक गव्हाणे

कात्रज : आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर 51मधील आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीत उभारला असून बाजूनेच ओढा जात आहे. जांभुळवाडी तलावापासून वाहणारा ओढ्यालगत हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातील कचरा ओढ्यात पडला जात आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या हा ओढा आणखी अरुंद होऊन कचरा प्रकल्पातील कचरा ओढ्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिसरातील जांभूळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावापासून वाहणारा ओढा आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे वडगाव मार्गे नदीला मिळतो. सदर ओढा तलावातील पाण्यामुळे व मुसळधार पावसामुळे वाहत आहे. सदर ओढ्याची गेली कित्येक वर्ष स्वच्छता केली नाही तसेच सदर ओढ्यावर कुठेही संरक्षण कठडे बांधलेले नसल्यामुळे ओढ्याच्या पात्रातील पाणी बाहेर पडत असून परिसरातील अनेक सोसायट्यामध्ये शिरल्याचा अनुभवही नागरिक सांगतात.

आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या परिसराचा गेली तीन वर्षापूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. महापालिका समावेशनांत्तर कोणताही ठोस विकास निधी या भागासाठी मिळाला नसल्यानेही भागातील नागरिकांत तीव्र नाराजी आहे. त्याचबरोबर या कचरा प्रकल्पामुळे भागात मोठ्या प्रमाणात सुरू असणारे ग्रहप्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या ओढ्याने रुद्रावतार धारण केल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे या भागात पुर आला होता. अनेक सोसायटी व घरामध्ये पाणी शिरले होते. तसेच काहींना जीव गमवावा लागला होता. अनेक वाहनेही वाहून गेली होती. परंतु, त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. तर याउलट हा कचरा प्रकल्प माथी मारला आहे. -संदीप शिंदे, नागरिक

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT