gas prices sakal media
पुणे

दरवाढीचा भडका ! गॅस सिलिंडर वापराच्या प्रमाणात घट

सिलिंडरच्या किमती कशा ठरतात, याबाबत पेट्रोलियम कंपन्या आणि केंद्र सरकारकडून कोणतीही पारदर्शकता दाखविली जात नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे खालविलेली आर्थिक परिस्थिती आणि गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे देशात सिलिंडर वापरकर्त्यांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली, असा दावा प्रयास उर्जा गटाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने किमान देशातील गरजू लोकांना तरी पुन्हा सिलिंडरवरील अनुदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘सिलिंडच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि त्यामागील कारणे’ या विषयावर सजग नागरिक मंचाच्या वतीने ऑनलाइन कार्यक्रमात प्रयास उर्जा गटाचे अशोक श्रीनिवासन यांनी हा दावा केला. या वेळी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते. श्रीनिवासन म्हणाले, ‘‘देशात गॅस सिलिंडरधारकरांची संख्या २८ कोटी आहे. जून २०२० पासून अचानक केंद्र सरकारने सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान बंद केले. या काळात कोरोना उद्रेक झाला होता. नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातच सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे गॅसधारक वापरकर्त्यांची संख्या ६ टक्क्यांवरून ५.८ टक्क्यांपर्यत खाली आली. त्यात ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या देशात १ कोटी गॅसधारकांना अनुदानित सिलिंडर मिळतात. सरसकट नाही, परंतु गरजू नागरिकांना तरी अनुदानित सिलिंडर मिळाले पाहिजे.’’

सिलिंडरच्या किमती कशा ठरतात, याबाबत पेट्रोलियम कंपन्या आणि केंद्र सरकारकडून कोणतीही पारदर्शकता दाखविली जात नाही, असे सांगून श्रीनिवासन म्हणाले, ‘‘गॅस सिलिंडरला सध्या तरी कोणताही पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. परंतु गॅस सिलिंडरचा वापर कसा वाढले, ग्राहकांनाही कसे परवडेल आणि सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही, याचा विचार करून नवनवीन योजना अंमलात आणण्याची गरज आहे. त्यावर चर्चा होताना दिसत नाही. शून्य ते पन्नास युनिट वापरासाठी एक दर, पन्नास युनिटच्या पुढे दुसरा दर अशाच प्रकारे वापरावरदेखील मर्यादा आणण्यासाठी सवलत योजना आणता येऊ शकतो. यावर सरकारने विचार केला पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT