girl from Bangalore is safe with the help of Pune police 
पुणे

पोलिसांतील माणुसकी : ती बंगळुरुवरून आली, जवळ फक्त १०० रुपये अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील नामांकित आयटी कंपनीत मुलाखतीसाठी बंगळुरुहुन एक तरुणी पुण्यात आली. मात्र, खिशात केवळ शंभर रुपये उरले. एवढ्या कमी पैशात नवीन शहरात आठवडाभर गुजराण कशी होणार या चिंतेतून तिने थेट पोलिस ठाणे गाठले. तिच्याबरोबर झालेली हकीकत पोलिसांना सांगितली. तरुणीवर ओढवलेला प्रसंग पाहून येरवडा व कोथरूड पोलिसांनी तिची राहण्याची सोय केली. पोलिसांच्या या तात्पुरतेमुळे तिला मोठा दिलासा मिळाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

24 वर्षाची ही तरुणी मुळची कोलकत्ता येथील आहे. तिने बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले असून ऑक्टोंबर 2019 पासून ती बंगलुरु येथील एका कंपनीत नोकरी करीत होती. लॉकडाऊनमुळे तिची नोकरी गेली. त्यामुळे तिने तिने हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनीत नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केला. 29 जून रोजी तिची मुलाखत आहे. त्यासाठी ती बंगळुरुहून पुण्यात आली. परंतु, प्रवास व लॉकडाऊनमधील खर्चामुळे तिच्याकडे केवळ १०० रुपये उरले होते. पुणे स्टेशनला आल्यावर तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. पुण्यात कोणीही ओळखीचे नाही म्हणून शेवटी तिने पेईंग गेस्ट म्हणून राहण्याच्या दृष्टीने रुम शोधण्याचा प्रयत्न केला. पण, होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे तिला कोणीच ठेवून घेतले नाही.
-----------
लष्करप्रमुख मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
-----------
भारत चीन वादात पडण्यास रशियाचा नकार
-----------
18 जून रोजी ती येरवडा पोलिस ठाण्यात पोहचली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी तिची विचारपूस केल्यावर तिने आपली सर्व हकीकत सांगून आपली असहाय्यता व्यक्त केली. घरुनही मदत न मिळाल्याने तिची अडचण लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व महिला कर्मचार्‍यांना बोलावून घेऊन तिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्रांती कक्षात राहण्याची व्यवस्था केली. तिच्यासोबत महिला कर्मचारी राजे व रासकर यांना ठेवण्यात आले. पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वर्गणी काढून तिला राहण्यासाठी व स्वखर्चासाठी पुरेशी रक्कम गोळा केली. तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कोथरुड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दशभुजा गणपती मंदिराजवळ एका ठिकाणी तिची राहण्याची सोय केली. तिला महिला कर्मचार्‍यांनी सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पोहचविण्यात आले. नव्या शहरात आलेल्या, कोणतीही ओळख नसता ही तरुणी कळत नकळत कोणाचेही सावज बनू शकली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT