Corona Symptoms
Corona Symptoms Sakal
पुणे

मुलांना द्या खबरदारीची लस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत (Second Wave) बाधितांमध्ये मोठ्यांप्रमाणे लहानग्यांचीही संख्या मोठी होती. तथापि, मोठ्यांसाठी आता लस (Vaccine) उपलब्ध झाली असली तरी मुलांना (Child) अद्याप ती उपलब्ध (Available) झालेली नाही. त्यामुळे या काळात त्यांची विशेष काळजी (Special Care) घ्यायला हवी. मुलांनाही स्वतः कशी खबरदारी घ्यावी, याच्या सूचना पालकांनी (Parents) वारंवार कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (Give children the precautionary vaccine)

मुलांच्या संसर्गाची लक्षणे कोणती, त्यांना उपचार कोणते, मुलांमधील संसर्ग रोखण्यासाठी नेमके काय करावे, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी पालकांच्या मनात काहूर माजवले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’शी संवाद साधताना बाल संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. संजय मानकर म्हणाले, ‘‘पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण पाच टक्के होते. या मुलांमध्ये लक्षणे दिसून येत नव्हती. दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले. तसेच, त्यांच्यात लक्षणेसुद्धा दिसून येत आहेत. कोरोना विषाणूंमध्ये आलेल्या म्यूटंटमुळे हे बदल दिसून आले. ज्या मुलांना यकृत, मूत्रपिंडाचे आजार किंवा इतर कोणते आजार असले तर त्यांना संसर्गाचा धोका वाढू शकतो.’’

बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारेख म्हणाले, ‘‘बहुतेक मुलांमध्ये सौम्य तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली असून, अशा मुलांवर देखील यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच प्रौढांमध्ये लसीकरण झाले असून, लहान मुलांमध्ये लस देण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. तर बारा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लस मिळावी याकरिता असलेल्या प्रस्तावाला अजून मान्यता मिळालेली नाही.’’

हे नक्की करा

  • मुलांना मास्क, सॅनिटाझरचा वापर करणे याबाबत समजावून सांगावे

  • घरातील स्वच्छता व मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तू स्वच्छ ठेवा

  • खोकताना किंवा शिंकताना वापरला जाणारा टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका

  • मुलं अस्वच्छ हातांनी डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करू नये यासाठी लक्ष द्या

  • मुलांच्या जेवणात पोषक आहार असू द्या

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना औषधे देऊ नका

  • मुलांचे शक्यतो बाहेर जाणे टाळा

वयोगटातील ट्रेंड

  • पाच वर्षांपर्यंतची मुलं हे आईवडिलांच्या संपर्कात जास्त असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाची शक्यता जास्त

  • आठ वर्षांवरील वयोगटातील मुलं बाहेर खेळताना संपर्कात आल्याने बाधित

  • दमा, लठ्ठपणा किंवा इतर आजार असलेल्या मुलांना कोरोनामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता

  • सध्या कोरोनामुळे लहान मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी’ सिंड्रोमचे (एमआयएस-सी) प्रमाण जास्त

दुसऱ्या लाटेत लहान मुलांना देखील संसर्ग झाला आहे. परंतु लहान मुले लवकर बरी होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीसुद्धा पालकांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. तसेच आजाराला बरे करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे अधिक उत्तम ठरते.

- डॉ. अंशू सेठी, बालरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT