Murlidhar MOHOl 
पुणे

पुणे ‘ग्लोबल मेयर्स’च्या अंतिम फेरीत; जगातील 631 महापौरांमधून निवड

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या‍ शहरांसाठी ग्लोबल मेयर्स स्पर्धा घेण्यात आली.

पुणे - कोरोनाशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या‍ शहरांसाठी ग्लोबल मेयर्स स्पर्धा घेण्यात आली. ‘ग्लोबल : २०२१ मेयर्स चॅलेंज’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ‘ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीज’च्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ९९ देशांतील ६३१ शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे. शहराच्या वतीने ‘इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया’ ही योजना ‘२०२१ : ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज’ या स्पर्धेत सादर केली आहे. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होईल. आणि यातून अंतिम १५ शहरांची निवड होईल. यात निवड होणाऱ्या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात आव्हानांचा सामना करताना असताना अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांमध्ये या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.’’

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याच्या ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ या संकल्पनेची अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठी सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.’’

‘इलेक्ट्रिक व्हेइकल्स’बाबतचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केला. विजेवरील वाहनांचा वापर वाढविण्यासाठी यासाठी कृतीयोग्य धोरणे आखणे व ही वाहने चालविण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनांचा आराखडा महापालिका तयार करणार आहे. यासाठीचा ‘इव्ही’ निधी या वाहनांना प्रोत्साहनपर आर्थिक सवलती, चार्जिंग स्टेशन्स, इतर संभाव्य संबंधित घटक आदींचा आराखडा तयार करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्लूमबर्ग निधीचा विनियोग करणार

विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. ब्लूमबर्ग निधीचा यासाठी विनियोग करण्यात येईल. यामध्ये सिटी ‘इव्ही रेडिनेस प्लॅन’ तयार करणे आणि ‘सिटी इव्ही’ निधी उभारण्याचा समावेश आहे. योजनेतील कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे निश्चित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

या स्पर्धेविषयी...

-स्पर्धेत ९९ देशांतील ६३१ शहरांचे अर्ज

-पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश

-इलेक्ट्रिक वाहनांच्या संकल्पनेचे सादरीकरण

-हवामान, वातावरण घटकांतर्गत शहराची निवड

-अंतिम फेरीतून १५ शहरांची निवड होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

SCROLL FOR NEXT