valsepatil
valsepatil 
पुणे

वेळेत कर्ज फेडणाऱ्यांना परतावा;वळसे-पाटील यांची शेतकऱ्यांना खुशखबर

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पीककर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा परतावा देण्याची घोषणा केली. पण कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळल्याने हे आश्र्वासन अद्याप पूर्ण करता आलेले नाही. परंतु सरकारचा निर्णय कायम असून आर्थिक स्थिती सुधारताच शेतकऱ्यांना हा परतावा दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) १०३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार दिलीप मोहिते, आमदार यशवंत माने, उपाध्यक्षा अर्चना घारे, माजी आमदार पोपटराव गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, प्रा. दिगंबर दुर्गाडे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. 

वळसे पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भू-विकास बॅंका डबघाईस येऊन कायमस्वरूपी बंद पडल्या आहेत. केंद्र सरकार हे सहकारी संस्थांसाठी घातक ठरणारे आणि शेतकरी विरोधी कायदे करत आहे. परिणामी सहकारी संस्था आणि छोट्या बॅंकापुढे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील पुणे, नगर, सातारा यासारख्या हाताच्या बोटावर मोजण्यापुरत्या बॅंकांचा अपवाद वगळला तर, जिल्हा बँकांची स्थितीही बिकट बनली आहे. अशाही परिस्थितीत पुणे जिल्हा बँक देशात अग्रेसर आहे. या बॅंकेला जपण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे.’’ 

२७३ कोटींचा ढोबळ नफा 
बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी प्रास्ताविक केले. राज्यात कोरोनाचे संकट असतानाही पुणे जिल्हा बॅंकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याही स्थितीत बॅंकेला २७३ कोटींचा ढोबळ नफा तर, ५० कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे थोरात यांनी सांगितले. या सभेत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन तर, तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३ विविध कार्यकारी सोसायट्यांचा गौरव करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT