The government is for the farmers only But ,suicide does not stop Said P Sainath.jpg 
पुणे

सरकार शेतकऱ्यांसाठीच; पण आत्महत्या थांबत नाहीत'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सरकार स्थापन करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा दावा राजकीय पक्ष करतात पण, केंद्रामध्ये सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतेच कृषीमंत्री होते, तरीही सर्वाधिक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केली.

बारामती कोणत्या पवारांसोबत? ऐका लोक काय म्हणताहेत...

सिंबायोसिस आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ "देशाच्या ग्रामीण भागात पत्रकारिता करताना डिजीटल युगातील आव्हाने' या विषयावर आयोजित व्याख्यानात पी. साईनाथ बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख रुची जग्गी यावेळी उपस्थित होत्या.

इंदापूरचे आमदार भरणे अजित पवारांच्या पाठीशी?

पी. साईनाथ म्हणाले, देशभरात सर्वाधिक 66 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. ग्रामीण भागातील समस्या, विषयांना सध्याच्या प्रसार माध्यमांमध्ये अतीशय कमी स्थान मिळते. गेल्या पाच वर्षाच्या अकडेवारीचा अभ्यास केला तर राष्ट्रीय दैनिकांच्या पहिल्या पानावरील ग्रामीण बातम्यांचे प्रमाण 0.67 टक्के एवढे कमी आहे. तर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडीचे प्रमाण तब्बल 61 टक्के, प्रादेशिक बातम्या 8 ते 10 टक्के असतात. मनोरंजन आणि गुन्ह्यांच्या बातम्यांना खुप महत्व दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागाचे समस्या समोर येत नाहीत.

पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ? 

राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग हे खरे पत्रकार होते, त्यांनी सामाजिक प्रश्‍नावार भूमीका घेऊन त्याविरोधात लढा दिला. आपल्याकडे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यातील दरी वाढत आहे. स्थलांतरामुळे ग्रामीण जनतेचे कौशल्य हरपत असून ते धोकादायक आहे.

जागतीक तापमान वाढीमुळे परदेशात बर्फ वितळल्याचे आपण दाखवितो, पण बीडमध्ये पडलेला दुष्काळ, लातूरमध्ये 43 अंश सेल्सीयस तापमान असताना होणारी गारपीट यामुळे प्रचंड नुकसान होते, हे दाखविण्याकडे आपले दूर्लक्ष होते. माध्यमांनी वाचकांना, प्रेक्षकांना काय गरजेचे आहे ते दिले पाहिजे. डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील जनतेचे विषय समोर आणत आहोत, असे साईनाथ यांनी सांगितले.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT