पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील २ लाख ६५ हजार केशरी शिधापत्रिका धारकांना शनिवार (ता.२५) पासून टोकन पद्धतीने धान्य वाटप केले जाणार आहे.
शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उर्वरित केशरी शिधापत्रिका धारकांना रास्त भाव धान्य दुकानांमधून शनिवारपासून (ता.२५) सवलतीच्या दरात धान्य वाटप केले जाणार आहे. गहू ८ रूपये प्रति किलो, तांदूळ १२ रूपये प्रति किलो या दराने शिधापत्रिकेवरील प्रति व्यक्तीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात केशरी शिधापत्रिका धारकांची संख्या २ लाख ६५ हजार इतकी असून लाभार्थी संख्या १० लाख इतकी आहे.
दरम्यान, शनिवारपासून (ता.२५) केवळ केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप केले जाणार आहे. तर अंत्योदय आणि अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना ५ मे पासून धान्य वाटप करण्याचे नियोजन आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे.
त्यानुसार, सर्वप्रथम सकाळी निर्धारित वेळेने टोकन घेतलेल्या शिधापत्रिका धारकाला धान्य वाटप केले जाईल. या टोकन वर शिधापत्रिका धारकाने कोणत्या वेळेस धान्य घेण्यासाठी यायचे आहे, याची नोंद केली जाणार आहे. त्यानुसार, शिधापत्रिका धारकांनी ठरलेल्या वेळेतच दुकानामध्ये जाऊन धान्य घ्यावे.
लाभार्थ्यांनी धान्य घेताना सुरक्षित सामाईक अंतर ठेवावे. तसेच मास्कचा वापर करावा. रास्त भाव धान्य दुकाने पोलीसांच्या सूचनेनुसार पूर्ण वेळ चालू राहतील. दुकानांना पुरेसा धान्य साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. धान्य वितरण ३१ मे पर्यंत होणार असल्याने शिधापत्रिका धारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ही अन्न धान्य वितरण कार्यालयाने केले आहे.
शिधापत्रिका धारकांसाठी हेल्पलाईन
- टोल फ्री क्रमांक १०७७
- मदत केंद्र क्रमांक - ०२०- २६१२३७४६ (सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत)
- मोबाईल क्रमांक : ८१४९६२११६९, ८६०५६६३८६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.