gravitational waves detected 100 years after einstein's prediction america LIGO Lab Sakal
पुणे

महाराष्ट्रातील 'या' प्रकल्पासाठी अमेरिकाच घोड्यावर; चिन-ऑस्ट्रेलियालाही डावलले

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी १९१७ मध्ये केलेले भाष्य शंभर वर्षांनी खरे ठरले

सम्राट कदम

पुणे : विश्वाच्या निर्मितीविषयी भाष्य करणाऱ्या गुरूत्वीय लहरींचा शोध लायगो या अमेरिकेतील वेधशाळांनी घेतला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी १९१७ मध्ये केलेले भाष्य शंभर वर्षांनी खरे ठरले.

जगभरात आता लायगो वेधशाळेने गुरुत्वीय लहरींच्या शोधाची चर्चा असून, जगातील तिसरी लायगो प्रयोगशाळा भारतात उभी राहावी म्हणून अमेरिकाच घोड्यावर बसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील लायगो प्रयोगशाळेसाठी आवश्यक डिटेक्टर अमेरिकेने आधीच तयार केला असून, भारतात आगमणाच्या प्रतिक्षेत आहे.

गुरूत्वीय लहरींचा शोध घेणारी जगातील तिसरी वेधशाळा भारतात उभी राहावी म्हणून अमेरिकाच प्रयत्नशील आहे. त्यासाठीचा आवश्यक ‘डिटेक्टर’ अमेरिकेने या आधीच तयार करून ठेवला आहे.

आता फक्त प्रतिक्षा आहे ती, हिंगोली जिल्ह्यातील लायगो वेधशाळेच्या बांधकामाची! केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामालाही सुरवात झाली असून, पुढील सात ते आठ वर्षांत वेधशाळा कार्यान्वित होईल, असा विश्वास राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश वाडदेकर यांनी व्यक्त केला.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट येथे आयोजित पुणे विज्ञान संवादात ते बोलत होते. डॉ. वाडदेकर यांनी गुरूत्वीय लहरींच्या शोधासंदर्भात माहिती दिली. गुरुत्वीय लहरींच्या निर्मितीपासून ते डिटेक्शन पर्यंतचे विज्ञान त्यांनी उलगडून सांगितले.

यावेळी महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या लायगो प्रकल्पाचे महत्त्व त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेमध्ये सध्या दोन लायगो वेधशाळा कार्यान्वित आहे. अमेरिकेच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेल्या भागात जगातील तिसरी लायगो वेधशाळा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरवातीला ऑस्ट्रेलियाची चाचपणी करण्यात आली.

मात्र, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने भारताकडे हा प्रस्ताव आला. भारतीय खगोल संशोधन संस्थांनी सरकारच्या मदतीने हिंगोलीत जागा निश्चित केली असून, तेथील कामालाही सुरवात झाली आहे. दरम्यान वेधशाळेसाठी लागणारा तिसरा डिटेक्टरही तयार करण्यात आला असून, भारतात येण्यासाठी तो सज्ज आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी नंतर कोणतेही आर्थिक आणि तांत्रिक अडचणी या प्रकल्पासमोर नाही.’’ केंद्राचा अणु ऊर्जा विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च, पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र आणि राजा रामण्णा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सेंटर या संस्था यात सहभागी आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रानडे इन्स्टिट्यूट येथे पुणे विज्ञान संवादाचे आयोजन करण्यात येते.

भारतातील लायगोची सद्यःस्थिती

- जमीन अधिग्रहनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात

- अमेरिकेने तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुरू केले आहे

- प्रकल्पासाठीची आर्थिक तरतूद निश्चित झाली

- भविष्यातील आवश्यक मनुष्यबळाची निर्मिती सुरु

- अमेरिकेचे शास्त्रज्ञ आणि अभियंतेही मदत करणार

हिंगोलीच का?

मोठ्या शहरापासून दूर असलेल्या महामार्ग, रेल्वे मार्ग विरहीत जागेची गरज होती. जेणेकरून मानवी हालचालींमुळे अनावश्क अडथळे निर्माण होणार नाही. तसेच पुण्यापासून आणि हैदराबादपासून हिंगोलीतील औंढा-नागनाथ ही जागा पाच ते सात तासांच्या अंतरावर आहे. वेधशाळेच्या ५० किलोमीटरच्या परीघाबाहेर विकासकामांना आणि कारखाण्यांना उभारणीस कोणतीही हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : १ डिसेंबरला नेमकं काय होणार? CJI सूर्यकांतांचा गूढ इशारा… सुप्रीम कोर्टात मोठा बदल की काहीतरी वेगळंच?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर; उडुपीतील श्रीकृष्ण मठाला देणार भेट

विराट, रोहित अन् रिषभ पंत...! धोनीच्या घरी सजली भारतीय क्रिकेटपटूंची 'मैफिल', पाहा VIDEO

Nagpur Accident : शहरात अपघातांसह मृत्यूंची संख्या घटली; आपरेशन ‘यू-टर्न’चे यश

TET Paper Leak : 'टीईटी' पेपर फुटला! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर, विद्यार्थ्यांकडून कबुली; २६ संशयितांची नावे निष्पन्‍न...

SCROLL FOR NEXT