purandar 
पुणे

किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन 

दत्ता भोंगळे

गराडे (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदरवर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने भव्यदिव्य सोहळा रद्द करून प्रातिनिधिक स्वरूपात अभिवादन करण्यात आले. 

यावेळी आमदार संजय जगताप, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, प्रशांत पाटणे यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरंदरेश्वराच्या शिवालयात पूजा करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर कडेकोट बंदोबस्त होता. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, दिलीप यादव, सासवडचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, पानवडीचे सरपंच हरिभाऊ लोळे, सागर जगताप, संतोष हगवणे, आनंद जंगम, गणेश जगताप, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, शिक्षक नेते संदीप कदम, संजय लवांडे, नंदकुमार चव्हाण, राजाभाऊ जगताप, शांताराम कावडे आदी उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन पुरंदरच्या गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने केले. 

पाळणा, छबिना, पालखी सोहळा, मर्दानी खेळ, चित्त थरारक कसरती, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, पोवाडे, व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व प्रकारचे धार्मिक, राजकीय, सामाजिक सोहळे रद्द करण्यात आले होते. दरवर्षी हजारो लाखो शंभूभक्त गडावर जयंतीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे गड गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे शंभूभक्तांची निराशा झाली. 

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन व त्यांनी केलेला संघर्ष, याचा अभ्यास शंभुभक्तांनी व तरुणांनी केला पाहिजे. संभाजी महाराज यांचे विचार सर्वांना प्रेरणादायी आहेत. 
- संजय जगताप, आमदार  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT