fraud
fraud  
पुणे

जीएसटी कार्यालयाची ५ कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे- कोणत्याही मालाची खरेदी व विक्री न करता तब्बल २५ कोटी रुपयांची वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बनावट बिले बनवून सरकारचा पाच कोटी रुपयांचा जीएसटी चुकविणाऱ्या पंढरपूर येथील एका कंपनीच्या संचालकास केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. 

राकेश सुरेकर (रा. पंढरपूर) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाच्या (पुणे २) ‘हेडक्वार्टर्स प्रिव्हेंटिव्ह युनिट’चे सहाय्यक आयुक्त सचिन घागरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेकर याची मे. जे. प्लास्ट पॅक प्रा. लि. नावाची कंपनी आहे. संबंधित कंपनीकडून दिल्लीस्थित बनावट कंपन्यांकडून तंबाखू व तत्सम पदार्थांच्या कच्च्या मालाची तब्बल २५ कोटी रुपयांची बिले मिळविली. या बिलांच्या आधारे ५.६ कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट वापरून तयार मालाची बनावट निर्यात बिले तयार केली. त्याद्वारे ५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रोख जीएसटी परतावा मिळविला. दरम्यान, सुरेकर याने या संपूर्ण व्यवहारामध्ये कोठेही कोणत्याही प्रकारच्या मालाची खरेदी किंवा विक्री केली नाही. त्यामुळे त्याने पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी बुडविला. 

या प्रकरणाची जीएसटी आयुक्तालयाने गांभीर्याने दखल घेऊन त्याच्या कंपनीवर छापा घातला. त्या वेळी अधिकाऱ्यांनी सुरेकर याची चौकशी केली. त्या वेळी सुरेकर याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, त्यास अटक करून पंढरपूर न्यायालयामध्ये १६ नोव्हेंबरला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT