on Gudi Padwa lottery will be declared 2890 houses of MHADA 
पुणे

गुढीपाडव्याला मिळणार गुडन्युज! म्हाडाच्या २८९० घरांची होणार सोडत 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ८९० घरांची ऑनलाइन सोडत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. या सोडतीचा प्रारंभ १३ एप्रिलला सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस.व्ही. आर, श्रीनिवास, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत. 


१३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १३ मे २०२१ सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी https:/lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्जाची नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे. दोन महिन्यांपूर्वी २२ जानेवारी रोजी झालेल्या म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पाच हजार ६४६ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर या वर्षातील ही दुसरी सोडत आहे. 

हे वाचा - पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT