corona1 
पुणे

दौंडकरांनी जिंकली कोरोनाची अर्धी लढाई...

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, एकूण ५१० जणांना बाधा झाली असून, त्यापैकी तब्बल २५५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज तालुक्यातील सात महिलांसह एकूण २१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ७३ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार शहरातील जनता कॅालनी, शालीमार चौक, समतानगर, बंगला साइड, पाटील चौक, सहयोग सोसायटी, पंडीत नेहरू चौक आणि लिंगाळी (ता. दौंड) येथील जगदाळे वस्ती, आदी भागातील एकूण १२ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ७ पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वय १४ ते ८२ दरम्यान असल्याची माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 
                
दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात २८ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार ताम्हाणवाडी येथे ४, कानगाव येथे २ व हातवळण, कुरकुंभ व खुटबाव येथे प्रत्येकी एक, असे एकूण ९ जणांना बधा झाली आहे. बाधितांमध्ये ७ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वय २८ ते ५५ दरम्यान असल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.

उपचारानंतर २५५ जण बरे
दौंड शहर व तालुक्यात २९ एप्रिल ते २८ जुलै या कालावधीत दौंड शहरातील २८० व तालुक्यातील २३०, असे एकूण ५१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४९, गट क्रमांक पाचचे ६, पोलिस, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस, यांचा समावेश आहे. त्यापैकी एकूण २५५ जण बरे झाले. तर, दौंड शहरातील बारा व ग्रामीण भागाती चार, अशा एकूण सोळा जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये दहा महिन्याचे बाळ ते ८२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT