Harman International announces a ₹345 crore investment in Pune to expand automotive electronics manufacturing and create new job opportunities.
esakal
Harman International’s Major Investment in Pune : 'हरमन इंटरनॅशनल' ही कंपनी त्यांच्या पुणे ऑटोमोटिव्ह प्लांटचा विस्तार करण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक करत आहे. या घडामोडीमुळे आता पुण्यात मोठ्यासंख्येत नवीन नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच, कनेक्टेड कार तंत्रज्ञानाचे उत्पादनही वाढवणार आहे. या सुविधेमुळे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्ससोबत सह-विकसित केलेल्या नेक्स्ट-जनरेशन टेलिमॅटिक्स युनिट्स देखील उपलब्ध होतील.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची पूर्ण मालकीची सहायक कंपनी आणि कनेक्टेड ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानात जागतिक आघाडीवर असलेल्या हरमन कंपनीने पुण्याच्या चाकण येथील त्यांच्या ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ३४५ कोटींची नवीन गुंतवणूक जाहीर केली आहे.
या गुंतवणुकीत तत्काळ विस्तारासाठी ४५ कोटी आणि पुढील तीन वर्षांत अडव्हान्स टेलिमॅटिक्स आणि नेक्स जनरेशन ऑटोमोटिव्ह कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्संना पाठबळ देण्यासाठी अतिरिक्त ३०० कोटींचा समावेश आहे. यामुळे २०१४ पासून पुण्यातील प्लांटमध्ये हरमनची एकूण गुंतवणूक ५५४ कोटींवर गेली आहे. तर या या विस्तारामुळे २०२७ पर्यंत पुण्यात ३०० नवीन रोजगार निर्माण होतील.
कंपनीने सांगितले की, ३४५ कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीतून उत्पादन क्षमतेत ५० टक्के वाढ होईल. कंपनी कंपनी हरित उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल आणि २०३० पर्यंत १०० टक्के हरित ऊर्जा वापराचे ध्येय साध्य करेल.
हारमनचे सीईओ आणि ऑटोमोटिव्हच्या अध्यक्षे क्रिश्चियन सोबोटका म्हणाले, “ही गुंतवणूक भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. पुणे केवळ क्षमता वाढवत नाही - ते कनेक्टेड कारचे भविष्य घडवत आहे. 5जी टेलिमॅटिक्सपासून ते ग्रीन मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत, भारताची प्रतिभा आणि नाविन्यपूर्ण शक्ती हरमनला जागतिक ऑटोमोटिव्ह वाढीचे केंद्र बनवते.”
हरमनचा पुणे प्लांट कनेक्टेड कार तंत्रज्ञानासाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करतो आहे. ज्यामध्ये कॉकपिट्स, टेलिमॅटिक्स युनिट्स आणि कार ऑडिओ सिस्टमचा समावेश आहे. कंपनी हे भाग टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा यासारख्या अनेक भारतीय वाहन निर्मात्या कंपन्या विकले जातात. तसेच युरोप आणि उत्तर अमेरिकेतील ग्राहकांना ते निर्यात होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.