icu bed 
पुणे

पुण्यातील खासगी रुग्णालयं ताब्यात घेण्यावरून वाद

सकाळ वृत्तसेवा

धायरी : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला आहे. बहुतांश धर्मदाय व खाजगी रुग्णालये जागा असुनही रुग्णांवर उपचार करत नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांचे उपचारा अभावी बळी जात आहेत. प्रशासनाने सिंहगडरोडसह पुण्यातील खाजगी रुग्णालये तातडीने ताब्यात घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हवेली तालुका नागरिक कृती समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिला आहे. याबाबत समितीने निवेदन दिले आहे. समीतीचे अध्यक्ष चव्हाण पाटील तसेच पोपटराव खेडेकर, अमर चिंधे ,संतोष ताठे, सुभाष नाणेकर आदींनी या गंभीर स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, प्रशासन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र रुग्ण संख्या वेगाने वाढल्याने प्रशासनाची यंत्रणा अपुरी पडत आहे. धायरी येथील तरुणाचा उपचारा अभावी मुत्यु झाला. कोरोना संशयितांना खाजगी रुग्णालये उपचार नाकारत आहेत.त्यामुळे रुग्णांचे मुत्यु होत आहेत. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेवरच उपचार मिळावेत.  यासाठी शहर व उपनगरातील खाजगी हाँस्पिटल ताब्यात घ्यावी. तसेच सार्वजनिक इमारतीत कोविड सेंटर, क्वारांटाईन सेंटर सुरू करण्यात यावे. आजाराचे वेळेवर निदान करणे, बाधित व संपर्कातील व्यक्तीवर उपचार करणे , क्वारांटाईन करणे यासाठी रुग्णालयात, क्वारांटाईन सेंटर मध्ये जागा मिळत नाही असंही श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले. 

रुग्ण संख्या वाढल्याने संशयित व बाधितांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासन तपासणी, उपचार मोफत देत आहेत. मात्र खाजगी रुग्णालयांनी कोरोना पँकेज.च्या नावाखाली लुट सुरू केली आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या रुग्णांना महागडे उपचार परवडत नसल्याचेही श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT