Having mental problems due to Corona then follow this 8 advise 
पुणे

कोरोनाने मानसिक त्रास होतोय...? हे आहेत आठ सल्ले...!

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात हजारो बांधकाम कामगार आणि मजूर अडकून पडले आहेत. कामगार-मजुरांसाठी या क्षणी सर्वात महत्वाचे आहे ते मानसिक समुपदेशन. पुण्यामध्ये तीन हजार कामगार-मजुरांचे मानसिक समुपदेशन सुरू झाले आहे. तीन हजार कामगार-मजुरांचे मानसिक समुपदेशन करण्यात येत आहे. कामगार-मजुरांसाठी आठ कलमी समुपदेशनाचा हा कार्यक्रम आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कामगार-मजुरांसाठी काय आहे सल्ला?

1. सर्वप्रथम स्वतःचे संरक्षण करा
2. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
3. सुरक्षित सामाजिक –शारीरिक अंतर ठेवा
4. तोंडावर मास्क बांधा 
5. साबणाने सतत हात धुवा
6. सॅनिटायझरचा वापर वापर करा
7. योग्य आहार घ्या; व्यायाम करा
8. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा

येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसअॅबीलीटीज आणि पुणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात हा उपक्रम सुरू झाला आहे. क्रेडाईच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना संस्था मानसिक आधार देत आहे. ही माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कामगार-मजुरांना कोविड19 बद्दल शास्त्रशुद्ध माहिती पुरविणे, मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालनालयाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाच्या मदतीने मजुरांचे मानसिक समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात हा उपक्रम सुरू झाला आहे. 

आता दारू संपते की काय, अन् मग झाली बाणेर-बालेवाडी परिसरात एकच गर्दी 

कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजच्यावतीने समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाचे 35 विद्यार्थी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाईच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये जात आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या मनोविकार तज्ञ डॉ मधुमिता बहाले व मानसोपचार तज्ञ मिलिंद कारंजकर यांच्या मदतीने मजुरांना कोविड19 बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरवित आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करीत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजचे चेअरपर्सन प्रा. चेतन दिवाण यांनी सांगितले.

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS : दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत जुबेरकडून सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'तरुण मुलांपेक्षा म्हातारेच जास्त....' ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेंट चर्चेत, म्हणाली...'त्यांची खूप प्रॅक्टिस झाल्यानं ते...'

Zubair Hungergekar: साेलापुरातील जुबेरच्या शाळेतील भाषणाचे ‘एटीएस’ने मागितले व्हिडिओ; तीन दिवस विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची होणार पडताळणी

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा केले कौतुक, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे दिले संकेत

SCROLL FOR NEXT