havy rains in pune city traffic jam in different areas pune rain update  
पुणे

Heavy Rains in Pune: मुसळधार पावसामुळे पुणेकरांची कोंडी! कुठे गेले वाहतूक पोलिस?

सकाळ डिजिटल टीम

पुणे: परतीच्या मुसळधार पावसाने आज पुन्हा पुणे शहराला चांगलंच झोडपून काढले, तास दिड तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पुणेकर पावसात अडकून पडलेत. रस्त्यांवर वाहतूक कोडींही मोठ्या प्रमाणवर पाहायला मिळत आहे. पण वाहतूक पोलिस मात्र कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूकीवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे. अशावेळी नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर कोणीही नसल्याने ते हतबल झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस प्रमुख कुठे आहेत? असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जातोय.

उपनगरात नागरिकांचे हाल

हडपसर-मांजरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. सोलापूर महामार्गावर रविदर्शन चौक, मगरपट्टा चौक, ससाणेनगर रस्ता, मांजरी रस्त्यावरील इंद्रप्रस्थ सोसायटी चौक, अण्णासाहेब मगर महाविद्यालय चौक, डीपी रस्ता, सिध्देश्वर हॉटेल चौक, मगरपट्टा वेस्टगेट समोरील रस्ता, गाडीतळ-हडपसर परिसरातील उड्डाणपुलाखाली व ठिकठिकाणच्या सोसायटी परिसरात मोठ्याप्रमाणात पाण्याची तळी साठली आहेत. साडेसतरानळीच्या ठाणगे वस्तीत काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. उड्डाणपुलाखालील पथारी व्यवसायिकांचे पुलाच्या सांध्यातून कोसळणाऱ्या पाण्यात भिजून नुकसान झाले आहे.

बिबवेवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला स्वामी विवेकानंद मार्गाला नदीचे स्वरुप आले होते, भारत ज्योती ते अप्पर कमानी पर्यंत रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले. बिबवेवाडी कडून अप्पर कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती. इंदिरा नगर, महेश सोसायटी चौकात मोठय़ा प्रमाणात पाणी आले.

तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होती. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले होते. अनेक दुचाकी, रिक्षा यावेळी पाणी गेल्याने बंद पडल्या. त्यामूळे वाहन वाहन चालकांवर वाहने पाण्यातून ढकलत नेण्याची वेळ आली. पाण्यात अडकलेल्या वाहनचालकांना मदतीचा हात दिला. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT