Pune_Rain 
पुणे

Video : जोरदार पावसाने पुणे शहराला झोडपले; घरांमध्ये शिरले पाणी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या साथीने भयभीत झालेल्या पुणे शहरात शुक्रवारी (ता.1) दुपारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसानेही झोडपून काढले. परिणामी, शहरभरातील मोकळे रस्ते ओढ्या-नाल्यांसारखे वाहिले; झाडे उन्मळून पडली, तर काही भागांत झाडांच्या फांद्या रस्त्यावर उतरल्या.

तेव्हाच इमारतींवरील मोबाईल टॉवर हेलकावे घेत होते; तर विजेच्या वाहिन्याही तुटल्याचे दिसून आले. काही भागांतील ओढ्या-नाल्यांलगच्या झोपड्यांत पाणीही शिरले; अर्ध्यातासाच्या पावसाने थैमान घातल्याने पुणेकरांत प्रचंड घबराट निर्माण झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, पावसाचा जोर लक्षात खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तर लोकवस्त्यांमध्ये साचलेले पाणी आणि पडलेली झाडे बाजुला करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाची यंत्रणाही रस्त्यांवर आली. 

पुणे शहरात रविवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. काही मिनिटांतच पावसाचा जोर वाढला आणि वादळी वाऱ्याचीही भर पडली. वाऱ्याच्या वेगात रस्ते आणि घरांभोवतीचे मोठमोठी झाडे हेलकावे घेऊन लागल्याने पुणेकरांत घबराट निर्माण झाली. कोथरूड, कर्वेनगर, कात्रज, कोंढवे धावडे, धायरी फाटा, सिंहगड रस्ता आणि शहरातील इतर भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. 

त्याचवेळी बहुतांशी रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी साचले. तेव्हाच, विविध भागांत 28 ठिकाणी झाडे आणि त्यावरच्या फांद्या पडल्या तक्रारी आहे. दरम्यान, बैठक घरे आणि झोपड्या असलेल्या भागांत पावसाचे पाणी साचल्याने त्या घरांमध्ये शिरल्याच्याही तक्रारी आल्या.

दरम्यान, शुक्रवारी शहर आणि परिसरातील कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 24.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शनिवारी (ता.2)सुद्धा शहरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण असल्याचा इशारा पुण्यातील हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: शरद पवार 'जंतरमंतर'वर! अभिजित दीपकेंची घेतली भेट; आंदोलक आक्रमक, म्हणाले...

सोनम, सर उपोषण थांबवा! तुम्ही आणि विद्यार्थी देशाच्या भविष्यासाठी लढताय... माझा तुम्हाला फुल सपोर्ट; IPL संघ मालकिणीची पोस्ट व्हायरल

Live Updates Marathi : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्तेपदावरून विजेता दहियांना हटवलं, कारण काय?

Mumbai: पाच वर्षांत ६,५०० मेगावॉट विजेची गरज, मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, डेटा सेंटरचा थेट परिणाम

धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन | CJP Andolan

SCROLL FOR NEXT