पुणे

Pune Rains : पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या पूर्व भागातील उपनगरांना गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; तर सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड भागात दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पुढील चोवीस तास ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता कायम आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे दुपारी देण्यात आला होता. त्याचदरम्यान सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे वादळी वारा आणि पावसाला सुरवात होण्यापूर्वीच संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेकांनी घरी परत जाण्याचा प्रयत्न केला.

शाळकरी मुले संध्याकाळी वेळेत घरी पोचतील, अशी व्यवस्था पालकांनी केली होती, त्यामुळे सातच्या आत घरात गेलेले पुणेकर सुरक्षित होते. रात्री आठ वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेग वाढला आणि मुसळधार सरी पडू लागल्या.

पुण्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस 

शहरात एक ते 10 ऑक्‍टोबर या दरम्यान 42.2 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र या दहा दिवसांमध्ये सरासरीच्या दुप्पट म्हणजे 92.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सरासरीच्या तुलनेत 49.9 टक्के जास्त पाऊस पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

पावसाचा अंदाज 

शुक्रवार (ता. 11) ः ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता. 
शनिवार (ता. 12) ः मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता. 
रविवार (ता. 13) ः हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st T20I: अभिषेक शर्माचे शतकं हुकलं, पण कोणत्याच भारतीयाला न जमलेले विक्रम नावावर; भारताचे न्यूझीलंडसमोर भलेमोठे लक्ष्य

Pune News : कोलमडलेला संसार महापालिकेने सावरला; कामगाराच्या अपघातीमृत्यूनंतर १० लाखाची मदत

Pune Politics : विरोधी पक्षनेता पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? आक्रमक व अभ्यासू नगरसेवकासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात खलबते सुरू

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्याने ठाकरे गटाचा संताप

Pune Crime : पुण्यात सराईत गुन्हेगाराला बेड्या; आंबेगावातून 'गावठी पिस्तूल' अन् काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT