औंध (पुणे) : दिव्यांग इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिकाई) वतीने व बालकल्याणच्या सहकार्याने नुकतीच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फूट आॅपरेटेड सॅनिटाइजर स्टँडची मदत करण्यात आली. औंध येथील बालकल्याण संस्थेत डिकाईचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल गुरुजी यांच्या वतीने समाजसेवक महेंद्र ओसवाल, बालकल्याणच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे, डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते पंधरा दिव्यांग शाळांना वितरण करण्यात आले.
खास दिव्यांगांसाठी बनवण्यात आलेल्या या फूट आॅपरेटेड स्टँडची रचना दिव्यांगांना सॅनिटाइजर घेतांना सोयीची होईल अशीच केलेली आहे. यावेळी कर्वे रस्ता येथील जीवन ज्योती शाळा, जीवन ज्योती कार्यशाळा, निगडी येथील ब्रम्हदत्त मतीमंद विद्यालय, पांडवनगर येथील चेतना पुनर्वसन सेंटर, टिंगरेनगर येथील विशेष मुलांच्या स्नेहा सेंटरसह इतर शाळांना हे सॅनिटाइजर स्टँडचे वाटप करण्यात आले.
दिव्यांगांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून अशा प्रकारच्या स्टँडची मागणी शाळांकडून करण्यात आली होती. बालकल्याण व डिकाईच्या वतीने दिव्यांगांची अडचण लक्षात घेऊन खास त्यांच्या सोयीचे असे सॅनिटाइजर स्टँड उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार स्वयंचलीत स्टँड उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही डिकाईचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल गुरुजी यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.