High demand for flowers due to the last Thursday of the Margashirsha month
High demand for flowers due to the last Thursday of the Margashirsha month 
पुणे

फुल उत्पादकांच्या चेहऱ्यावर उमटले हसू; फुलांचा वाढला भाव

दत्ता जाधव

माळशिरस : मार्गशीष महिन्यातील उद्या शेवटचा गुरुवार असल्याने घरोघरी होणाऱ्या लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी पुणे येथील फुल बाजारात आज पाहावयास मिळाली. यामुळे सर्वच फुलांचे बाजारभाव चांगल्याप्रकारे तेजीत दिसले. 

हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या 
मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी लक्ष्मी मातेची प्रत्येक गुरुवारी पूजा करून शेवटच्या गुरुवारी सांगता पूजा केली जात असल्याने या निमित्ताने फुलांची मोठ्या प्रमाणावर ती घरोघरी मागणी असते. उत्पादकांसाठी यामुळेच दसरा-दिवाळी याप्रमाणेच हा महिना देखील चांगला तेजीचा जातो. आज पुणे येथील फुलबाजारात याचा प्रत्येक उत्पादकांना आला .फुल बाजारात आज पौर्णिमा या शेवंती वर्गीय फुलांना किलोला शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.

झेंडूची फुले 40 ते 50 रुपये किलो पर्यंत विकली गेली. बिजली 60 ते 80 रुपये किलो पर्यंत तर कापरी चाळीस ,पन्नास रुपये किलो पर्यंत विक्री झाली.  गुलछडी दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत किलोने विकली गेली. गुलाब गड्डी  चांगल्या प्रतीची 40 रुपये ते 50 रुपयांपर्यंत विकली गेली .बाजारातील या फुलांच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या मागणीमुळे कालपासूनच उत्पादकांना चांगल्या प्रकारे बाजार भाव मिळाल्याने कोरोणाच्या संकटकाळात देखील उत्पादकांना मार्गशीष महिना दिलासादायक ठरणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT