The highest number consumers in the Pune have sent theirmeter readings of April through the portal and mobile app. 
पुणे

स्वत:हून मिटर रिडींग घेण्यात राज्यात पुणेकर ठरले स्मार्ट 

सकाळवृत्तसेवा

पुणे : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील तीन लाख 63 हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे गेल्या महिन्याचे (एप्रिल) स्वतःहून मीटर रिडींग पाठविले आहे. त्यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 69 हजार 912 तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील 58 हजार 210 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात स्वत:हून मिटर रिडींग घेण्यात पुणेकर स्मार्ट ठरले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे महावितरणने 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्‍य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

दरम्यान महावितरणने http://www.mahadiscom.in वेबसाईट व महावितरण र्ल ऍपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून एसएमएस पाठविला गेला. त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात आली होती. महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल तीन लाख 63 हजार 171 वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे.

पुणेकरांनो ऐकलं का? जीवनावश्‍यक वस्तूंसह इतर दुकाने खुली; कंटेन्मेंट झोनमध्ये बंदी
 
महावितरणकडे स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील 69 हजार 912, कल्याण- 58 हजार 210 , भांडूप- 37 हजार 543 , नागपूर- 27 हजार 720 , नाशिक- 25 हजार 831 , कोल्हापूर- 22 हजार 728 , बारामती- 20 हजार 941 , जळगाव- 17 हजार 664 , औरंगाबाद- 16 हजार 374 , अकोला- 13 हजार 767 , अमरावती- 13 हजार 540 , चंद्रपूर- , कोकण-8 हजार 824 , नांदेड- 8 हजार 542 , गोंदिया- 7 हजार 268 आणि लातूर परिमंडलामधील 6 हजार 963 वीजग्राहकांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT