Gram_Panchayat_Election 
पुणे

पुणे : यंदा फक्त 661 ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा उडणार धुरळा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. 4) जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आणि गावातील प्रमुखांनी चर्चा करून गट-तटांना तिलांजली देत 85 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 661 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यामुळे आता गावांमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. त्यामुळे इच्छुकांसोबतच माघार घेणाऱ्या अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दुपारी गणेश कला क्रीडा येथे गर्दी केली होती. या वेळी काही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.  

निवडणूक चिन्हांचे वाटप : 
अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आले. तसेच, जात पडताळणी प्रमाणपत्रही ऑफलाइन दाखल करण्याची सुविधा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे नेमके किती उमेदवारी अर्ज मागे घेतले, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  रात्री उशिरापर्यंत अंदाजे 85 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र - 

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती - 746
प्राप्त उमेदवारी अर्ज - 21 हजार 771 
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती - 85
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - 661

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT