Hotels PMP bus Theater Closed for 7 days Curfew after 6 PM pune Ajit pawar Murlidhar Mohol 
पुणे

पुण्यात हॉटेल, थिएटर 7 दिवस बंद; पीएमपी सेवेबाबत महत्त्वाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे , पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शनिवार (ता. 3) पासून पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, माॅल्स आणि चित्रपटगृह पुढील सात दिवस बंद राहतील. परंतु हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार आहे. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ संचारबंदीचा काळ वगळता पीएमपीएल सेवा सुरु राहील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय : 

- शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार
- हॉटेल, रेस्टॉरंट, बार, माॅल्स आणि चित्रपटगृह पुढील सात दिवस बंद. परंतु हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार
- लग्न समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रम वगळता इतर सर्व राजकीय, सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी
- एसटी सेवा सुरु राहणार 
- आठवडे बाजार बंद राहणार  
- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस संचारबंदीच्या काळात (सायंकाळी 6 ते सकाळी 6)
 पुढील सात दिवस बंद.
- गृहनिर्माण सोसायट्यांमधील स्विमिंग पूल, क्लब हाऊस व्यायामशाळा सात दिवस बंद 
- विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार
-  उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना 
- उद्याने सायंकाळी बंद राहणार
- पुढील शुक्रवारी पुन्हा आढावा बैठक घेऊन नियोजन करणार



''खासगी कार्यालयांमधून संचारबंदीच्या काळात घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबत पत्र दिले, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार'' माहिती सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.

पुण्यात कडक निर्बंध; वाचा काय आहेत नवीन नियम

लसीकरणासाठी 'मिशन 100 डेज'
जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. दररोज 60 ते 70 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 45 वर्षे वयावरील नागरिकांची संख्या 26 लाखापर्यंत असून, येत्या शंभर दिवसांत ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. तसेच, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार लसीकरणाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT