Housing societies will have home delivery of vegetables 
पुणे

गृहनिर्माण सोसायट्यांत घरपोच धान्य, भाजीपाला 

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या सहकार विकास महामंडळाने गृहनिर्माण सोसायट्यांमधील सभासदांना आता थेट घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे पुरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोसायट्यांमधील सभासदांनी मागणी नोंदविल्यास धान्य आणि किराणा दोन दिवसांत तर, ताजा भाजीपाला दुसऱ्या दिवशी घरपोच मिळणार आहे. 

"घराबाहेर पडून नका येऊ कोरोनाच्या सानिध्यात, आम्ही पोचवू शेतमाल आपल्या दारात' हे ब्रीदवाक्‍य घेऊन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प्रत्येक सोसायटीत पोचणार आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून विशेष कार्याधिकारी संतोष पाटील, राज्य सहकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांच्यासह संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. सोसायट्यांमधील सभासद आणि शेतकरी, शेतमाल उत्पादक कंपन्यांमध्ये महामंडळ समन्वयाची भूमिका बजावणार आहे. एखाद्या सभासदाने संकेतस्थळावर जाऊन धान्य किंवा भाजीपाल्याची मागणी नोंदविल्यास त्यानुसार महामंडळाचे अधिकारी संबंधित शेतकरी आणि कंपनीसोबत संपर्क साधतील. त्यानुसार सोसायट्यांना घरपोच पुरवठा करण्यात येईल. 

अशी नोंदवा मागणी... 
1. महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळाच्या www.mcdc.com या संकेतस्थळावर जाऊन धान्य, किराणामाल, पालेभाज्या आणि फळांची मागणी नोंदविता येईल. 

2. सोसायटीमधील प्रत्येक सभासदाला मागणी नोंदवता येईल. परंतु, यामध्ये समन्वयक म्हणून सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव काम पाहतील. 

3. प्रत्येक सोसायटीला विशिष्ट कोड क्रमांक देणार आहे. त्याचा वापर करून सभासद मागणी नोंदवू शकतील. 

संकेतस्थळावर अर्जात भरावयाची माहिती ः 
गृहनिर्माण सोसायटीचे नाव, पत्ता, सभासदाचे नाव, मोबाईल क्रमांक व शेतमालाचा तपशील : गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, पीठ, डाळी, किराणामाल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ याची मागणी नोंदविता येईल. 

नोंदणीसाठी येथे साधा संपर्क... 
9404515537 
9225563987 
8483881018 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोसायट्यांमधील सभासदांना रास्त दरात घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळावीत यासाठी सहकार महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रत्येक सोसायटीसाठी बाराही महिने ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 
- मिलिंद आकरे,  व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी महामंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT