Citizens have to cross the road carefully due to lack of signal at Kinara Chowk and closure of subway..jpg 
पुणे

सिग्नल नाही, भुयारी मार्ग बंद; किनारा चौक ओलांडायचा तरी कसा?

समाधान काटे

पौंड रस्ता (पुणे)  : लाॅकडाऊन होताच वनाज कंपनी जवळील किणारा चौकातील पौंड रस्त्याच्या खाली असलेला ति. डाॅ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग बंद करण्यात आला. दुकाने, हॉटेल इतर व्यवसाय सध्या सुरू झाल्याने, लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक घराबाहेर खरेदीसाठी पडू लागले आहेत. याच रस्त्यावर मेट्रोचे काम देखील सुरू आहे. किनारा चौकामध्ये सिंग्नल नसल्याने तसेच भुयारी मार्ग बंद असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. 
 

लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेला भुयारी मार्ग कुलूप लावून बंद करण्यात आला. सकाळी ८ ते १२ तसेच रात्री ६ ते १० वाजेपर्यंत जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्ता ओलांडणे धोकादायक ठरू लागले आहे. भुयारी मार्ग लवकर लवकर सुरू करावा, अशी मागणी शंकर कानगुडे, गिरीश गुरुनानी यासह स्थानिक नागरिक करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक नागरिक राघवेंद्र निलेगांवकर म्हणाले, ''महापालिकेने लाखो रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवला. मात्र तो बंद करून महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. हा मार्ग नेहमी बंद असतो. कोणताही सुरक्षा रक्षक या ठिकाणी नाही. लोक आडोशाला बसून मद्यपान करतात. जीव मुठीत धरून लहान मुले, महिला रस्ता ओलांडतात.''
 
पौंड रस्त्यावरील दुकानदार मयुरेश मंचरकर म्हणाले, 'जेष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना अडथळा येतो. मेट्रोचे काम चालल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक आहे. महापालिकेने इथं लक्ष देऊन लवकरात लवकर इथला भुयारी मार्ग सुरू करावा'.

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला
        
कोथरूड बावधन क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम म्हणाले, 'किरकोळ स्वरूपात देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक नियोजन विभाग बजेट उपलब्ध करून देणार आहेत. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे.'
      .
मुख्य अभियंता वाहतूक नियोजनाचे श्रीनिवास बोनाला म्हणाले, 'हे काम सुरु करायचे की नाही, या विषयावर वरिष्ठ पातळीवर कळवून पुढच्या आठवड्यात सांगू शकेन.

महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT