Dog 
पुणे

Video : कोरोनाच्या काळात आपल्या प्राण्यांची काळजी कशी घ्यावी; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून तुम्हाला तुमच्या श्‍वानाची चिंता वाटतेय; पण काळजी करू नका. तुमच्या श्‍वानाची योग्य प्रकारे काळजी घेतली तर, त्याला काहीही होणार नाही. कारण श्‍वानाला कोरोना होत असल्याचे एकही उदाहरण देशात सापडलेले नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हेटर्नरी सर्जन त्रिभुवन कटरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात आपल्या प्राण्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. श्‍वानांची तर विशेष काळजी वाटते. कारण ते आपल्याबरोबरच राहत असतात; पण कोरोनाचा संसर्ग अद्याप तरी श्‍वानाला झालेला नाही. अमेरिकेतील एका शहरात श्‍वानाच्या मालकाला कोरोना झाला. त्यात मालकाचा मृत्यू झाला; पण श्‍वानाला काहीही झाले नाही. तसेच चीनमध्येही एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला; पण त्याची मांजर त्यातून वाचली आहे.’’

कोरोनाच्या काळात श्‍वानाला बाहेर फिरवून आणल्यावर त्याच्या अंगावर सॅनिटायझर मारू नका. कारण त्याच्या त्वचेसाठी ते हानिकारक असते, असेही डॉ. कटरे यांनी सांगितले. बाहेरून आल्यावर त्याला डॉग शॅम्पूने धुतले तरी पुरेसे असते. पावसाळ्यात श्‍वानांना बाहेर फिरायला नेल्यावर ते रस्त्यावरचे पाणी पितात. त्या खराब पाण्यामुळे त्यांना गॅस्ट्रो होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात त्यांचे लसीकरण करणे गरजेचे असते, असेही त्यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी

  • दिवसातून दोन वेळा फिरायला न्या
  • किमान १५ ते ४५ मिनिटे त्याला एकसारखे चालवा
  • पंधरा दिवसांतून एकदा अंघोळ घाला.
  • सॅनिटायझर अंगावर मारू नका
  • प्रतिकार शक्तीसाठी मांसाहार द्या  
  • अन्यथा दर्जेदार डॉग फूड द्या

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT