suicide 
पुणे

पोलिसांनी गावात सोडले नाही म्हणून पती- पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न 

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर १ येथे नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांशी गावात सोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात शेतकरी पती व पत्नीने मंगळवारी (ता. ७) विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नी अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४०) हिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर पती रोहिदास (वय ४५) अत्यवस्थ आहेत. त्यांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही घटना मंगळवार (ता. ७) सांयकाळी घडली.

याबाबतची माहिती अशी की, कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे उंब्रज नंबर एक हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून, गावात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. रोहिदास उर्फ बाबू  कुशाबा शिंगोटे हे पत्नी अनुजा यांच्यासह सकाळी भाजी विक्रीसाठी गाडी घेऊन गेले होते. संध्याकाळी परत येताना गावात जाण्यावरून त्यांता पोलिसांशी वाद झाला. या वेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील आले. त्यांनी या दांपत्यास समजवण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही त्यांनी जाण्यास नकार दिला. 

जोपर्यंत या पोलिसांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळी अचानक रोहिदास शिंगोटे यांनी खिशातील विषारी औषधाची बाटली काढून तोंडाला लावली. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांचा हात झटकला व ती बाटली खाली जमिनीवर पडली. मात्र, तीच बाटली उचलून त्यामधील औषध त्यांच्या पत्नीनेही प्राशन केले. हा प्रकार काही क्षणातच घडली. त्यामुळे उपस्थित सर्वांना धक्का बसला. 

या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी त्वरित ओतूर येथे नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच अनुजा यांचा मृत्यू झाला,तर रोहिदास यांस   नारायणगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे त्यांना हलवण्यात आले. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भुमिका घेतली होती. त्यानंतर चर्चेनंतर रात्री उशिरा त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

या वेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ओतूर येथे येऊन घटनेची माहिती घेतली. तसेच, या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील हे देखील उपस्थित होते.

संबधित दांपत्याचा गावात जाण्यावरून पोलिसांसोबत वाद झाल्याची माहिती समजताच मी त्याठिकाणी हजर झाले व त्यांना समजाऊन सांगितले. परंतु, या पोलिसांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही येथुन जाणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली.
 -सपना दांगट, 
सरपंच, उंब्रज (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT