पुणे

Vidhan Sabha 2019 : बहुमताने निवडून येईन; सुनील कांबळेंना विश्वास

सकाळ वृत्तसेवा

कँटोन्मेंट (पुणे) : सामाजिक न्यायाचा विचार कृतीत आणण्याची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आहे, याची खात्री सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाजाची झालेली आहे. त्यामुळेच हा समाज भाजपच्या मागे या निवडणुकीच्या वेळी उभा राहील आणि कॅन्टोन्मेंटमधून मी प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.

भाजपचे कॅन्टोन्मेंटमधील अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारास प्रारंभ झाला असून, या प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला. सुनील कांबळे म्हणाले, मोठे बंधू दिलीप कांबळे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे अन्य कोणताही पक्ष निवडणुकीत टक्कर देऊ शकणार नाही हा माझा विश्वास आहे. माझ्या नगरसेवकपदाच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत मी सातत्याने जनतेशी संपर्कात होतो आणि आहे.

पक्षसंघटनेत सामान्य कार्यकर्त्यापासून माझा प्रवास सुरू झाला. या दोन्हीमुळे मतदार आणि पक्षसंघटना माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही.
सुनील कांबळे यांच्या पुढील संपूर्ण आठवड्याच्या प्रचाराचे नियोजन पूर्ण झाले असून, पदयात्रा, मोटरसायकल रॅली, नामवंतांच्या गाठीभेटी याचा या नियोजनात समावेश आहे. पक्षाची संपूर्ण बूथरचना प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. 

कॅन्टोन्मेंट हा वैविध्यपूर्ण मतदारसंघ असून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध गट स्थापन करण्यात आलेले आहेत. प्रचारात कोणतीही उणीव राहू नये यादृष्टीने नियोजन केलेले असून पुढच्या दोन दिवसात प्रचार पूर्ण ताकदीनिशी सुरू झालेला असेल, असेही येथील प्रमुख कार्यकत्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT