ICU set up in Pune in eight hours 
पुणे

Coronavirus:पुण्यात आठ तासांत उभारले सुसज्ज ‘आयसीयू’

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आठ तासांमध्ये महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात जीवरक्षक उपकरणांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) कार्यान्वित झाला. ससून रुग्णालयातील कुशल आणि प्रशिक्षित डॉक्‍टरांची नियुक्ती झाली असून, प्रभावी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे पाच रुग्ण आढळले. त्यामुळे मंगळवारी धुळवडीची सुटी असूनही सर्व प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली. विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिका आणि ससून रुग्णालय अशा प्रशासनातील सर्व यंत्रणा सोमवारी रात्रीपासून सक्रिय झाली. मंगळवारी सकाळपर्यंत या सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत लालफितीच्या कारभारातून बाहेर पडून निर्णय घेत असल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते. त्यातूनच आठ तासांत डॉ. नायडू रुग्णालयात सर्व अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज ‘आयसीयू’ची स्वतंत्र खाट करण्यात यश आले. डॉ. नायडू रुग्णालयात स्वतंत्र अतिदक्षता विभाग नाही. पण, सध्या तेथे कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांच्या उपचारांसाठी अतिदक्षता विभाग उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. त्याबद्दल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या, ‘‘ससून रुग्णालयाच्या मदतीने ऑक्‍सिजनचा सिलिंडर, ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, मॉनिटर तातडीने बसविला. त्याचे नियोजन करून अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे तेथे आरोग्याची यंत्रणा सज्ज झाली. त्या व्यतिरिक्त पुढील दोन दिवसांत स्वतंत्र ‘आयसीयू’ कक्ष उभारणार आहे.’’ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘रुग्णाच्या कृत्रिम श्‍वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटर तसेच, त्याच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण, रक्तदाबाची माहिती मॉनिटरवर दिसते. हृदय बंद पडायला लागल्यानंतर ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी डिफिब्रिलेटर अशी सर्व जीवरक्षक उपकरणे डॉ. नायडू रुग्णालयात बसविली आहेत.’’

२०७ खाटा सज्ज
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या कार्यक्षेत्रात २१ ठिकाणी २०७ खाटा, अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार केलेल्या आहेत. सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: महापालिकेसाठी शिंदे गट सक्रिय, लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी

Kolhapur Youth Clash : स्टेटस्‌वरून खुन्नस, दबा देंगे हर आवाज, जो उंची होगी...; महागडे कपडे, विनानंबर प्लेट दुचाकी..., कोल्हापूर पोलिसांची काय भूमिका?

सॉरी, आम्ही जग सोडतोय! चिठ्ठी लिहून महिलेनं ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी; पती घरातच झोपलेला

Asia Women Hockey: भारत-चीनमध्ये अंतिम फेरीची लढत; आशिया करंडक महिला हॉकी, आज सामना

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

SCROLL FOR NEXT