Identification of the dead body found near Katraj tunnel 
पुणे

यूपीतील युवकाची पुण्यात हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सकाळवृत्तसेवा

कात्रज (ता. ०८) : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज बोगद्याजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा सर्व प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. सुरुवातीला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, आता मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्याचा खिशात असलेल्या आधारकार्डवरून त्याचे नाव अजित सिंह असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

मराठी संशोधकाने दिल्लीतील धुक्याचे उकलले गूढ!

अजित सिंह मूळ सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश)मधील राहणार आहे. सध्या तो खेड शिवापूर, जि. पुणे येथे राहण्यास होता. तो पेंटिंगची कामे करत होता. सदर व्यक्तीने अंगामध्ये निळी जीन्स पॅन्ट, पायात शूज, अंगात लाल शर्ट घातलेला होता. त्याचे कुटुंब उत्तरप्रदेशातच रहायला असून तो व्यवसायिक दृष्टिकोनातून पुण्यात आला होता. त्याचा खून कोणी व का केला याचा तपास लागला नसून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञांताविरुद्ध कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गादर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक गंगाधर घावटे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Rajyotsava : बेळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश जारी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त!

Recharge Plan : मार्केटमध्ये धमाका... फक्त १४७ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग! 'या' स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी काय मिळतं?

८ वर्षीय मुलाचा क्रौर्याचा कळस, वर्गात ६ वर्षीय चिमुकलीला विटा, कुंडीने मारहाण; बेशुद्ध झाली तरी मारत राहिला, घटना CCTVत कैद

Apple: आता काय 'क्रेटा' विकून 'मॅकबुक-प्रो' घ्यायचा का? ॲपलच्या लॅपटॉपची का होतेय एसयूव्हीशी तुलना?

Marathi News Live Updates : शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द, महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीमुळे मनसेचा निर्णय

SCROLL FOR NEXT