khalad 
पुणे

आमच्या गावातील वाळू चोरल्याचे आम्ही खपवून घेणार नाही...

योगेश कामथे

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्यातील खळद येथे कऱ्हा नदीपात्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा होत असून, याबाबत महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळे या वाळू चोरांना अभय कोणाचे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आमच्या गावातील वाळू चोरल्याचे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. 

खळद गावच्या बाजूला खंडोबाची वाडीलगत असणाऱ्या "वाघ्याचा डोह" येथील नदीपात्रामध्ये रोज रात्री वाळू उपसा होत आहे. याबाबत काही नागरिकांनी रात्रीच्यावेळीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली तर ते येईपर्यंत हा उपसा तातडीने बंद होतो. त्यामुळे कारवाईवेळी काहीच सापडत नाही. याबाबत आठ दिवसांपूर्वी गावच्या पदाधिकाऱ्यांसोबत तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तर पंचनाम्यासाठी सबळ माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. २० जुलैला जिल्हा पथकाचा पंचनामा, तर बुधवारी (२२ जुलै) पुन्हा मंडल अधिकारी जी. एच. लाखे यांनी पंचनामा केला, तर वाळू उपसा झाल्याचे आढळून आले व त्यानुसार पंचनामा करण्यात आला. या वेळी तलाठी एस. आर. बनसोडे, एस. यू. मोकाशी, व्ही. पी. पाटील, उपसरपंच सुरेश रासकर, पोलिस पाटील वृषाली कादबाने, शिवाजी कामथे, नितीन कामथे, कोतवाल शिवाजी कामथे, संतोष म्हेत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, पंचनामा होऊनही अद्यापपर्यंत पुढील कारवाई झाली नाही. "हा पंचनामा तहसील कार्यालयात दाखल केला जाईल व त्यानंतर पुढील कारवाई केला जाईल, असे मंडल अधिकारी जी. एच. लाखे यांनी सांगितले.

आमच्या गावामध्ये गेल्या काही वर्षापासून वाळू उत्खनन बंद असून, गावातील सर्वसामान्य नागरिक अथवा ग्रामपंचायत स्वतःच्या कामासाठीही बाहेरून वाळू विकत घेते. मात्र, कधीही नदी पात्रातील वाळू उपसा करत नाही. असे असताना कोणीतरी बाहेरून येऊन आमच्या गावातील वाळू चोरत असेल, तर ग्रामस्थ ते खपवून घेणार नाहीत. याबाबत महसूल विभागाने नुसता पंचनाम्याचा फार्स न करता वाळूचोरांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. आम्ही त्यांना साथ देऊ. आम्ही ग्रामपंचायत पदाधिकारी व दक्षता समितीची बैठक बोलवली असून, वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पुढील धोरण ठरविणार आहे, असे उपसरपंच सुरेश रासकर यांनी सांगितले. 

यासंदर्भात तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही निश्चितपणे कारवाई करू, पण गावातील अवैध उत्खननाबाबत ग्राम दक्षता समिती स्थापन केली असून, या समितीनेही अवैध उत्खननावर देखरेख ठेवावी व असे उत्खनन आढळून आल्यास आम्हास तातडीने कळवावे, यावर आम्ही कारवाई करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT