Gas-Cylinder-Truck 
पुणे

Lockdown : गॅस सिलेंडरच्या ट्रकमधून केली जात होती कामगारांची वाहतूक; ट्रकचालकावर...!

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून १० मजुरांना अहमदनगरकडे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांना वाघोलीतील तात्पुरत्या निवाऱ्यात पाठविण्यात आले आहे.

रामसखा हिरालाल साकेत या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत गॅस सिलेंडरची वाहतूक या ट्रकमधून केली जात होती. नांदेड सिटी येथून या कामगारांना आणले होते. आणि तो त्यांना अहमदनगरला घेऊन चालला होता. लोणीकंद येथील तपासणी नाक्यावर हा ट्रक पकडण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एच. एस. पडळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हातभट्टीवर छापा 

पेरणे फाटा आणि वढुखुर्द येथील हातभट्टीवर लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किंमतीची रसायने जप्त केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. याचसोबत पाच दारू विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला, तर मास्कचा वापर न करणाऱ्या 15 जणांवर आणि विनाकारण फिरणाऱ्या आठ दुचाकी चालकांवर गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आल्या.

डी. बी. पथकाचे सहाय्यक फौजदार चांदीलकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, सदाशिव गायकवाड, विकास कुंभार, ऋषिकेश व्यवहारे, कीर्ती नरवडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT