indrayani1.jpg 
पुणे

आळंदीकरांनो, इंद्रायणीत यंदा गणेश विसर्जनास बंदी; घरीच करा पर्यायी व्यवस्था

विलास काटे

आळंदी (पुणे) :  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आळंदी ते मरकळ इंद्रायणी नदीत गणेश विसर्जनास संपूर्ण अकरा दिवस बंदी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर आळंदी पालिका आणि पोलिसांनी इंद्रायणी घाटावरील बंद पोलिस चौकी पुन्हा सुरू केली. नदीपात्रात गणेश विसर्जनाचा कोणी प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने गणेशभक्तांनी आता घरामध्येच पर्यायी व्यवस्था करून गणेश विसर्जन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकूश जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधऱ यांनी केले.


याबाबत अधिक माहिती देताना जाधव आणि चौधर यांनी सांगितले की, कोरोनाची साथ सध्या वेगाने पसरत असून आळंदी शहरात रोज रूग्ण आढळत आहेत. त्यातच दिघी, च-होली, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव आणि आळंदी लगतच्या गावांमधेही कोरोनाच्या रूग्णांमधे सातत्याने वाढ होत आहे. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात या भागातून मोठ्या प्रमाणावर गर्दी करून गणेशभक्त गणेश विसर्जनासाठी आळंदीतील इंद्रायणी काठी गर्दी करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आळंदी पालिका आणि पोलिसांनी पाऊल उचलले आहे. याबाबत नुकतेच पिंपरी पोलिस मुख्यालयात पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामधेही विसर्जन बंदीचा निर्णय घेतला.


दरम्यान आळंदीत इंद्रायणी काठी आज सकाळपासूनच बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू आहे. पोलिस उपनिरिक्षक अजय लोहेकर आणि त्यांच्यासोबत सहा कर्मचारी नेमले आहेत. पालिकेचे सहा कर्मचारी त्यांच्यासोबत दिले. पालिकेने जनजागृतीसाठी शहरात तसेच दिघी मॅक्झिन भोसरी फाटा, डुडुळगाव चौक, धानोरे फाटा या ठिकाणीही फलक लावले आहेत. इंद्रायणी घाटावर येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नदीच्या बाजूने बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. कुणी नदीपात्रात गणेश विसर्जनाचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती विघटन होण्यासाठी पाण्यामधे सोडीअम बाय कार्बोनेटचा वापर करावा असे आवाहन पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT