Impact of lockdown on meteorological observations and forecasts 
पुणे

लॉकडाऊनचा हवामानशास्त्रीय निरीक्षणे अन्, अंदाज वर्तवण्यावर 'असा' झाला परिणाम

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनचा एकीकडे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मात्र हवामानशास्त्र विभागासाठी लॉकडाऊनमुळे काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्या. त्यामुळे या काळात हवामानशास्त्रीय निरीक्षणे आणि अंदाज वर्तवण्यास प्रक्रियेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.एन. राजीवन यांनी दिली.

पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!
'भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थे'च्यावतीने 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. राजीवन हे 'कोविड 19 आणि हवामानशास्त्र' हा या विषयावर बोलत होते.

डॉ. राजीवन म्हणाले, "लोकडाऊनच्या काळात भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत खबरदारीचा भाग म्हणून काही निर्णय घेण्यात आले. त्यामुळे देशातील काही ठराविक वेधशाळे मार्फत गरजेनुसार अंदाज आणि निरीक्षणे नोंदविण्यात अली आहेत. परंतु यामुळे वर्तविण्यात आलेल्या हवामान अंदाजात कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. या काळात असे दिसून आले की येत्या काळात स्वयंचलित हवामान अंदाज वर्तविणाऱ्या तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे."

अटक न करण्यासाठी दुकानदाराकडे `त्यांनी` मागितली चक्क लाच मग...

जागतिक पातळीवर लॉकडाऊमुळे हवामानातील बदल या बाबत संशोधन करण्यात आले असून या संशोधनाला 'नेचर क्लायमेट चेंज' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानुसार जगभरात 'कार्बन डायऑक्साईड'च्या उत्सर्जनात सरासरीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. याचे मुख्य कारण आहे ते बहुतांश देशांच्या सीमांवर घातलेले निर्बंध. त्यामुळे वाहतुकांची रेलचेल कमी झाली, असे डॉ. संजीवन म्हणाले.
लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये रस्त्यावरील वाहनांची संख्या पूर्णपणे कमी झाली होती. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमधील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली. 

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा​

निष्कर्ष
- कोविड 19 लॉकडाऊनमुळे वातावरणात बदल
- मानवी हस्तक्षेप, रस्त्यावरील वाहतूककोंडी, वीज प्रकल्प आणि उद्योग-कारखान्यांमुळे सामान्यतः प्रदूषणात वाढ
- शासनाद्वारे वर्क फ्रॉम होम संकल्पना भविष्यातही अंमलात आणावी त्यामुळे प्रदूषण नियंत्रित करणे शक्य
- सद्यस्थितीत हवामानात झालेल्या बदलांचा अभ्यास करणे भविष्यासाठी फायदेशीर


हवामानशास्त्रीय निरीक्षणे आणि अंदाजांवर लॉकडाऊनचा परिणाम
- हवामान निरीक्षणासाठी देशात सुमारे 50 वेधशाळा
- लॉकडाऊन कालावधीत निरीक्षणासाठी वेधशाळेच्या संख्येत घट दिसून आले
- एप्रिल महिन्यापासून केवळ देशातील सुमारे 20 वेधशाळा निरीक्षण आणि अंदाज देण्यासाठी कार्यरत
- संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केवळ ठराविक वेधशाळांमध्येच काम सुरू
- लोकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जागतिक पातळीवर विमानसेवा निरीक्षणात सुमारे 70 टक्के घट
- भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे पारंपरिक निरीक्षणात घट
- लॉकडाऊनमुळे नदी व समुद्रातील प्रदूषणाची चाचणी करणे आव्हानात्मक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT