Amol-Kolhe 
पुणे

जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवा : खा. डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील घनकचर्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन होण्याची गरज आहे. यासाठी  ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवा, अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता.१२) पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना केली.   यानुसार गावा-गावात उपलब्ध होणारा कचरा, तेथील लोकसंख्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सुचविले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या आणि त्यावर करावयाच्या संभाव्य उपाययोजनासंदर्भात खासदार कोल्हे यांनी आज जिल्हा परिषदेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, सामाजिक न्याय सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी भारत शेंडगे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसला धक्का; 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी

यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासनाची रचना, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीची माहिती देण्यात आली. यावेळी कोल्हे यांनी पाणी पुरवठा, घनकचरा, शिक्षण आणि आरोग्याच्या स्थितीची माहिती जाणून घेतली.

आप आमदाराच्या गाड्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

कोल्हे म्हणाले, "ग्रामीण भागात बायोगॅस, परसबाग यासारखे उपाययोजना केल्या जातात. परंतु उपलब्ध कचरा, लोकसंख्या आणि सध्या उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील शहरांमध्ये  मैला शुद्धीकरणाचे प्रकल्पासारखे (एसटीपी) प्रकल्प राबविता येतील.शिरुर लोकसभा मतदारसंघातील धरणांचा विचार करता ग्रामीण भागात अधिकाधिक पाणी कसे उपलब्ध होईल, या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात. आदिवासी भागात सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे तातडीने त्या रुग्णांना रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रात पोहोचविण्यात रुग्णवाहिकेचे विशेष पथक उपलब्ध करून दिले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्राथमिक शाळामधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

SCROLL FOR NEXT