red soil 
पुणे

लाल मातीच्या वाहतुकीबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचा निर्णय 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : नर्सरी व्यवसायासाठी लागणाऱ्या लाल मातीची भोर तालुक्‍यातून वाहतूक सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

या परवानगीचा थेट फायदा पूर्व हवेलीमधील तीनशेहून अधिक नर्सरी व्यावसायिक व या व्यवसायावर अवंलबून असणाऱ्या हजारो छोट्या- मोठ्या कृषी व्यावसायिकांना फायदा होणार आहे. 

उरुळी कांचन, सोरतापवाडीसह पूर्व हवेलीमधील अनेक गावात मागील दहा वर्षापासून नर्सरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. या व्यवसायाची उलाढाल कित्येक कोटीच्या घरात आहे. नर्सरीसाठी लागणारी लाल माती भोर तालुक्‍यातील विविध गावांतून मागवली जाते. कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर मागील दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सरकारने माती वाहतुकीवर बंदी घातली होती. त्यातून लाल मातीअभावी हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.

दरम्यान तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य नर्सरी असोसिएशनच्या पदाधिकारी व पूर्व हवेलीमधील काही शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेऊन, लाल मातीच्या वाहतुकीस परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. 

याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य नर्सरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कोरेगाव मूळ येथील नर्सरी व्यावसायिक संतोष शितोळे म्हणाले, ""उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, सोरतापवाडीसह पूर्व हवेलीत तीनशेहून अधिक मोठ्या नर्सरी आहेत. या नर्सरी व्यवसायावर आधारित छोटे- मोठे व्यवसाय करणारे हजारो शेतकरी नर्सरी व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून लाल मातीच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नर्सरी व्यवसाय बंद पडला होता. नर्सरीसाठी लागणारी लाल माती ही केवल भोर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मातीची वाहतूक सुरू करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने आमदार अशोक पवार यांची भेट घेतली. त्यांनीही तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून लाल मातीच्या वाहतुकीस परवानगी देण्याची विनंती केली होती.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उरुळी कांचन येथील एलाईट नर्सरीचे मालक आकाश छाजेड म्हणाले, ""नर्सरीसाठी लागणाऱ्या लाल मातीचे वीस ते पंचवीस ट्रक भोरहून सासवडमार्गे उरुळी कांचन व परिसरात आणले जातात. लाल मातीची वाहतूक करताना रीतसर रॉयल्टी भरून व शेतकऱ्यांना मातीचा मोबदला आणली जाते. माती ही ट्रकमध्ये जेसीबीच्या साह्याने भरली जाते. माती व ट्रकला कोणाचाही संपर्क येत नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य नर्सरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष चौधरी, सोनबा चौधरी, शंकर कड, भानुदास जेधे, अमित चौधरी, दत्तात्रेय चौधरी व काही शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी तत्काळ हालचाली केल्या. त्यामुळे भोरच्या तहसीलदारांनी लाल माती वाहतुकीस रीतसर परवानगी दिली आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेतील नववीतल्या विद्यार्थ्याने मित्रावर शस्त्राने केला हल्ला

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT