IAS_Vikram_Kumar 
पुणे

पुणे व्यापारी महासंघाचे महापालिका आयुक्तांना साकडे; केली 'ही' मागणी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लाॅकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत लाॅकडॉउनमध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी शनिवारी (ता.१८) सकाळी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चा करताना २३ जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नये, ही आग्रही मागणी केली.

रांका म्हणाले, तीन महिन्यांच्या लॉकडाउन नंतर व्यवसायाला कशीबशी सुरवात होत असताना पुन्हा एकदा लॉकडाउन लादल्याने व्यापारी त्रस्त झाले असून, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. तसेच व्यापाऱ्यांना कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही तसेच करांमध्ये कोणतीही सूट मिळत नाही, एकीकडे बँकांचे व्याज, दुकानाचे भाडे, भरमसाठ लाइट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, घरखर्च असे अनेक खर्च चालू आहेत आणि दुसरीकडे व्यवसायच ठप्प असल्याने कोणतीही आवक नसल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना या संकटातून बाहेर काढणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असे नमूद केले.

कोरोना आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही रुळावर आणण्याची आता गरज असून, लॉकडाउनमुळे पुण्यात व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा भरून निघणे अशक्य आहे. तसेच दुकानांसाठी सम-विषमचे (P1/P2) बंधन काढून टाकण्यात यावे. जेणेकरून संभ्रम न राहता व्यापारी आणि ग्राहकांनाही ते सोयीचे होईल.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मनपा आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना तपासणीची शिबिरे भरवण्याचा मानस यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. त्यालाही व्यापारी महासंघाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि २३ तारखेनंतर यावर काम करण्याचे ठरल्याचे रांका यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची तब्येत बिघडली; लीलावती इस्पितळात दाखल; वडिलांच्या काळजीने भाईजानची इस्पितळात धाव

Eknath Shinde: पहलगाममध्ये मृत्युमुखी जगदाळेंच्या मुलीस सेवेत घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे महापालिकेस निर्देश!

Satara Crime: फलटणमधील दोघे तडीपार; सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई, विविध ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल!

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

Egyptian Treasure Theft : 3300 वर्षे जुना हार अन् अडीच हजार वर्षांपूर्वीची मांजरीची मूर्ती..; चोरीला गेलेला इजिप्शियन मौल्यवान साठा जप्त

SCROLL FOR NEXT