mla sngram thopte Sakal Media
पुणे

मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांना मिळणार दिलासा, कारण

आमदार संग्राम थोपटे व मावळ-मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के यांनी दिली महत्वाची माहिती

बंडू दातीर

पौड : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पौ ड येथील ग्रामीण रूग्णालयात 30 तर बावधनला 40 असे मिळून 70 आँक्सिजन बेड जलद गतीने तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे व मावळ-मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के यांनी दिली. आमदार थोपटे यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तहसिलदार कार्यालयामध्ये घेतला.

यावेळी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.अजित कारंजकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, दादाराम मांडेकर, युवा नेते मधुर दाभाडे, सरपंच समिर सातपुते, माजी सरपंच निलेश दगडे उपस्थित होते.

थोपटे म्हणाले की, पौड ग्रामीण रूग्णालयात आणि बावधन या दोन्ही ठिकाणी मेडिकल आँफिसर व नर्सची सोय केली जाईल. संदेश शिर्के म्हणाले की याठिकाणी आठवड्यातून सहा तास खाजगी डाँक्टर सेवा देतील. तहसिलदार चव्हाण म्हणाले की, पौड ग्रामीण रूग्णालयात होणाऱ्या प्रसुती या माण व माले याठिकाणी करण्यात येतील. तसेच येथे होणारे शवविच्छेदन व दररोजचे रूग्ण तपासणी पुढेही तशीच सुरू राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : एकतानगरी मधील नागरिकांचा आयुक्तांना घेराव

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT