3D-Printing 
पुणे

'पर्सनलाइज्ड मेडिसिन'क्षेत्रात थ्री -डी प्रिंटिंगची महत्वाची भूमिका - डॉ.शुभीनी सराफ

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'प्रत्येक रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव निर्मिती पासून औषध आणि पोषक घटक निर्मितीपर्यंत 'पर्सनलाइज्ड मेडिसिन'क्षेत्रात थ्री -डी प्रिंटिंगची महत्वाची भूमिका भविष्यात असेल',असे प्रतिपादन लखनौच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ. शुभीनी सराफ यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे 'कोरोना नंतरच्या जगात थ्री-डी प्रिंटिंगची गरज' या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. या वेबिनार मध्ये 90 हुन अधिक प्राध्यापक व संशोधकांनी आपला सहभाग निंदविला होता. 

डॉ. सराफ म्हणाल्या, 'कोरोना नंतरच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. वैद्यकीय उपकरणे निर्मिती, औषध निर्मिती, बायोलॉजिक्स मध्ये थ्री-डी प्रिंटिंग तंत्राचा उपयोग होणार आहे. शरीरातील ऊती, अवयव निर्मिती, बायो प्रिंटिंग यामध्येही या तंत्राचा उपयोग होणार आहे. फ़ार्मसी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज आहे. कोरोना हे असाधारण स्वरूपाचे संकट आहे. त्याच्याशी लढताना असाधारण गोष्टी लागतील. थ्री-डी प्रिंटींगही त्यातील एक असाधारण गोष्ट ठरू शकते."

जगभरात थ्री-डी प्रिंटिंगचे सेटअप आहेत आणि कोरोना संदर्भात लागणारे मास्क, व्हेंटिलेटर, फेस शिल्ड निर्मिती मध्ये या तंत्रज्ञानाचे योगदान पुढे येत आहे. याच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या गोष्टींचे प्रोटोटाइप करून पुढे त्याच्या चाचण्या घेऊन उत्पादन करता येणे शक्य आहे, असेही डॉ. सराफ यांनी सांगितले.

या वेबिनारचे संयोजन कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ किरण भिसे, डॉ कांचन चव्हाण, डॉ राणी पोटावळे, अमृता यादव आणि रजत सय्यद यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, सख्ख्या भाच्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; महापालिकेच्या रिंगणात उतरणार

Akola Municipal Elections : युती, आघाड्या अडल्या, तिकीट वाटप रखडले, राजकारण तापलं; अकोल्यात नेमकं घडतंय तरी काय?

Nagpur Theft : नागपूरमध्ये डिलिव्हरी बॉयकडून महागडे पार्सल लंपास; २२.३४ लाखांचा अपहार; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

31st December Trip: लांब कुठं न जाता, मनोरीमध्ये 31 डिसेंबरचा परफेक्ट प्लॅन करा आणि निसर्गरम्य न्यू इअरचा अनुभव घ्या!

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

SCROLL FOR NEXT