manchar hospital
manchar hospital 
पुणे

प्रसूतीपूर्वी 10 दिवस अगोदर गर्भवतींची होणार ही महत्त्वाची टेस्ट 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्भवतींची प्रसूतीपूर्वी 10 दिवस अगोदर रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मंचर येथे बुधवारी (ता. 5) उपजिल्हा रुग्णालयात गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णकल्याण समितीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, डॉ. वर्षाराणी गाडे, डी. के. वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता विजय अघाव, गणेश औटी, आमीन पठाण आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला
  
तातडीच्या गरीब व गरजू गरोदर माता व इतर रुग्णांकरिता एक्स-रे, सोनोग्राफी, रक्तपिशव्या आदी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी प्रयोगशाळाबरोबर सवलतीच्या दारात करार करणे, हंगामी स्वरुपात स्वच्छता कर्मचारी नेमणे, कोरोना विषयी जनजागृती करण्याचा व लोक सहभागातून गरम पाण्यासाठी गिझर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कालबाह्य झालेल्या पाईपलाईन बदलण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर सोपविण्यात आली.

कोविड संशयितांचे तातडीने अहवाल उपलब्ध व्हावा, यासाठी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानुसार गुरुवारपासून (ता. 30 जुलै) रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात आली. त्यासाठी आवश्यक असलेले कीट उपलब्ध आहेत. तपासणीनंतर ताबडतोब अहवाल प्राप्त होत असल्याने कोरोनाबाधितांचे विलगीकरण करून गरजेनुसार अवसरी खुर्दच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल कोविड केंद्र आदी ठिकाणी उपचार करणे सोयीचे झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील व डॉ. संजय भवारी यांनी दिली.

या वेळी औंध- पुणे हॉस्पिटल कोविड उपचार केंद्रात चार महिने काम करून परत मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्रात कार्यरत झाल्याबद्दल आधीपरिचारिका वैशाली राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिंदे यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर आलेले अनुभव कथन केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT