Inauguration of Robotic Knee Implant Center at Noble Hospital
Inauguration of Robotic Knee Implant Center at Noble Hospital 
पुणे

नोबल हॉस्पिटलच्या रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण केंद्राचे उद्घाटन

कृष्णकांत कोबल

मांजरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दिवसेंदिवस रुग्णांचे जीवन मोठ्या प्रमाणात सुसह्य होऊ लागले आहे. नोबल हॉस्पिटलकडून उपलब्ध करून दिली जात असलेली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे ही सर्जरी गुडघेदुखीच्या रुग्णाला वरदान ठरणारी आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले.

हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मांजरेकर बोलत होते.

हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे, लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे प्रमुख मकरंद टिल्लू, नवचैतन्य हास्य परिवाराचे प्रमुख विठ्ठल काटे, मगरपट्टा सिटीचे उमेश मगर, शिवसेना शहर प्रमुख महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी उपमहापौर निलेश मगर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, नगरसेवक बंडू गायकवाड, उमेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. 

हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, "मगर परिवाराच्या सहकार्याने अकरा वर्षापूर्वी नोबलची उभारणी झाली. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचाराचे तंत्रज्ञान नोबलने उपलब्ध करून दिले आहे. आज ३५० बेडचे नोबल हॉस्पिटल आहे. सुरू होत असलेले हे जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर  महाराष्ट्रातील दुसरे तर भारतातील आठवे सेंटर  आहे. शहर परिसरात भविष्यात नोबल हॉस्पिटलची अजून दोन युनिट सुरू करण्याचे आमचे प्रयोजन आहे.'

सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, 'नोबल हॉस्पिटलने सुरू केलेले अद्ययावत तंत्रज्ञान गुडघा दुखीच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरणारअसून आता या तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्र पळणार आहे.' 

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण तज्ञ डॉ. रोहित लुथ्रा यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. राज कोद्रे व टीना ढम यांनी सूत्रसंचालन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचं टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT